scorecardresearch

दुचाकीस्वार महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; पाठलाग करणाऱ्या महिलेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

येरवडा भागात दुचाकीस्वार महिलेचे ४५ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली.

ns1 robbery
संग्रहित छायाचित्र

पुणे : येरवडा भागात दुचाकीस्वार महिलेचे ४५ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. महिलेच्या मुलाने दुचाकीस्वार चोरट्यांचा पाठलाग केला. मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन चोरटे पसार झाले.

याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पद्मावती भागात राहायला आहे. महिला, तिची मुलगी आणि मुलगा विवाह समारंभासाठी गेले होते. येरवड्यातील सादलबाबा दर्गा परिसरातून ते निघाले होते. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे संगमवाडी पुलाच्या दिशेने पसार झाले. महिलेचा मुलाने हा प्रकार पाहिला. दुचाकीस्वार मुलाने चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. संगमवाडी पुलाजवळ चोरट्यांनी दुचाकीस्वार मुलाला धमकावले. पाठलाग करु नको, जीवे मारू, अशी धमकी देऊन चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक किरण डोंबाळे तपास करत आहेत.  

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The two wheeler snatched woman threatening kill child chasing woman pune print news ysh