scorecardresearch

Premium

मुंढवा उड्डाणपूल नव्या वर्षात वाहतुकीसाठी खुला?

मुंढवा, घोरपडी येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी हा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.

flyover Mundhwa final stage completed by the end of December pune
मुंढवा येथील मुळा मुठा नदीवरील पूल (फोटो सौजन्य- पुणे महानगरपालिका वेबसाईट)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: मुंढवा येथील उड्डाणपुलाची कामे अंतिम टप्प्यात आली असून, डिसेंबर अखेरपर्यंत ती पूर्ण करून नव्या वर्षापासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय महापालिका आणि रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या उड्डाणपुलामुळे मुंढवा परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

mandatory passengers start journey Pune metro 20 minutes entering station ticket pune
पुणे मेट्रोत ‘टाईमपास’ बंद! प्रवास करण्याआधी जाणून घ्या नवीन नियम…
pune municipal corporation, pmc warning about abandoned vehicles, abandoned vehicles on road in pune, pune ganeshotsav 2023
पुणे महापालिकेचा फतवा : रस्त्यांवरील बेवारस वाहने ताबडतोब काढा अन्यथा जप्ती
17 roads in Pune will be closed tomorrow
विसर्जन सोहळ्यासाठी पुण्यातील ‘हे’ १७ रस्ते राहणार उद्या बंद
Airport thieves have found a different way to steal bags; Which will surprise you for a moment
Video : विमानतळावर सामान चोरण्यासाठी चोरट्यांनी शोधले नवे तंत्रज्ञान; काही समजण्याआधीच तुमचे सामान होईल लंपास

मुंढवा, घोरपडी येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी हा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले. मात्र त्यानंतर उड्डाणपुलाचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. या पार्श्वभूमीवर आमदार सुनील कांबळे यांनी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त बैठक घेतली. उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण करून उड्डाणपूल नव्या वर्षापासून वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

हेही वाचा… आदिशक्तीकडून गणेशाची आराधना; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारो महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण

लष्कर भागातील नागरिकांना मुंढवा, केशवनगर, खराडी या भागांत जाण्यासाठी रेल्वे फाटक ओलांडावे लागते. तेथील रहिवाशांनाही पुणे शहरात येण्यासाठी हे करावे लागते. त्यात वेळ वाया जातो, तसेच वाहतूक कोंडीही होते. या मार्गावरून दिवसभरात सुमारे १०४ रेल्वेगाड्या जातात. तेवढ्या वेळा रेल्वे फाटक बंद करावे लागते. त्यामुळे महापालिकेने उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The work of the flyover at mundhwa has reached its final stage and it will be completed by the end of december pune print news apk 13 dvr

First published on: 20-09-2023 at 11:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×