प्रियकराच्या त्रासामुळे प्रेयसीने रेल्वेगाडीखाली आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन हडपसर पोलिसांनी प्रियकराला गजाआड केले. तारामती सूर्यवंशी (वय ३४, रा. सय्यदनगर, हडपसर, मूळ रा. परळी, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी विक्रांत दशरथ जगताप (वय ३८, रा. फौजी निवास, पाटील पार्क, उरुळी कांचन, सोलापूर रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक सुशील डमरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा- पुणे : जंगली महाराज रस्त्यावरही कोयता गॅंगचा धुमाकूळ; खाऊ गल्लीत दहशत माजविणारे गजाआड

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
sandeshkhali shahajahan shiekh
Sandeshkhali Case: लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली?
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
After Thackeraysena agitation in Kolhapur road works started
ठाकरेसेनेच्या आंदोलनानंतर महापालिकेला जाग; कोल्हापुरात रस्ते कामांना सुरुवात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ पासून तारामती आणि विक्रांत यांचे प्रेमसंबंध होते. तारामतीने कुटुंबीयांशी संपर्क तोडला होता. विक्रांत तिला त्रास देऊन तिचा छळ करत होता. त्याच्या छळामुळे तिने गेल्या वर्षी मांजरी परिसरात रेल्वेगाडी खाली आत्महत्या केली होती. सुरुवातीला या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. तपासात तारामतीने विक्रांतच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचे उघडकीस आले, अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली.

हेही वाचा- अंमली पदार्थ विकणारी महिला पाच वर्षांनी गजाआड; अंमली पदार्थ विरोधी पथकाची मुंबईत कारवाई

या प्रकरणात तारामतीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. ते तक्रार देण्यासाठी समक्ष उपस्थित राहू शकले नाही. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन विक्रांतला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके तपास करत आहेत.