लोणावळा : लोणावळा परिसरात एका डाॅक्टरच्या बंगल्यातून चोरट्यांनी पाच लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत डाॅ. किरण राघवेंद्र चुळकी (वय ४४, रा. विजयपूर, कर्नाटक) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ‘या’ चार शहरांची चर्चा! २३ एप्रिलला एक ठिकाण होणार निश्चित

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Property worth lakhs was robbed in two house burglaries in nashik
नाशिक : जिल्ह्यात दोन घरफोडींमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
A decrease in the supply of new houses was recorded in eight metros of the country print news
नवीन घरांच्या पुरवठ्यात घट, यंदा पहिल्या तिमाहीत ६९ हजारांवर; गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के कमी

हेही वाचा – “तुमची ५२ काय १५२ कुळं खाली उतरली, तरी…”, उद्धव ठाकरेंच्या विधानावर बावनकुळेंचा पलटवार; म्हणाले…

डाॅ. किरण चुळकी यांचा लोणावळ्यातील अंबरवाडी गणेश मंदिराजवळ असलेल्या हनीकोम्ब व्हिला परिसरात बंगाल आहे. डाॅ. चुळकी आणि त्यांचे मित्र दोन दिवसांपूर्वी लोणावळ्यात आले होते. रविवारी मध्यरात्री चोरटे बंगल्यात शिरले. चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या दरवाज्यातून प्रवेश केला. चोरट्यांनी लॅपटाॅप, पाच महागडे मोबाइल संच, डेबिट कार्ड, रोकड असा पाच लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला.
डाॅ. चुळकी यांच्या बंगल्यात चोरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून, पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुजावर तपास करत आहेत.