scorecardresearch

खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत चोरी; दोन युवती अटकेत

बिबवेवाडीतील एका सराफी पेढीतून खरेदीच्या बहाण्याने सोन्याची अंगठी चोरणाऱ्या दोन युवतींना सहकारनगर पोलिसांनी अटक केली. दोघींनी टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातून एक दुचाकीही चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

arrest
प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे : बिबवेवाडीतील एका सराफी पेढीतून खरेदीच्या बहाण्याने सोन्याची अंगठी चोरणाऱ्या दोन युवतींना सहकारनगर पोलिसांनी अटक केली. दोघींनी टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातून एक दुचाकीही चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून सोन्याची अंगठी तसेच दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तेजल दयानंद मुनेश्वर (वय २१), सुमेधा उल्हास मुनेश्वर (वय २१, दोघी रा. शिवनेरी हाइट्स, आंबेगाव पठार, धनकवडी) यांना अटक करण्यात आली आहे. बिबवेवाडी भागातील एका सराफी पेढीत तेजल आणि सुमेधा खरेदीच्या बहाण्याने गेल्या होत्या. सराफ व्यावसायिक आनंद पारख (वय ४७) यांचे लक्ष नसल्याची संधी साधून आठ ग्रॅमची सोन्याची अंगठी दोघींनी लांबविली. त्यानंतर दोघी खरेदी न करता पेढीतून बाहेर पडल्या. अंगठी चोरल्याचे लक्षात आल्यानंतर पारख यांनी याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे तपास सुरू केला. चित्रीकरणात दोघी दुचाकीवरून पसार झाल्याचे आढळून आले होते. दुचाकीच्या क्रमांकावर त्यांचा माग काढण्यात आला. आंबेगाव पठार भागात दोघींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ४५ हजारांची सोन्याची अंगठी आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत दोघींनी टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातून दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बापू खेंगरे, बापू खुटवड, महेश मंडलीक, प्रदीप बेडीस्कर आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Theft sarafi firm under the pretext purchase two young women arrested amy

ताज्या बातम्या