भारतात विविध समाज, पंथ निर्माण झाले त्यांनी आपली एक वेगळी संस्कृती, प्रार्थनापद्धती रुजवली. असाच एक समाज म्हणजे थिओसॉफिकल सोसायटी. न्यूयॉर्कमध्ये स्थापन झालेली ही सोसायटी भारतात आली आणि विस्तारली. याच सोसायटीच्या वास्तूला लॉज असं म्हणतात. आज आपण पुण्यातील याच थिओसॉफिकल सोसायटीच्या पुण्यातील ‘पूना लॉज’ला भेट देणार आहोत.
