दिलासादायक : पुण्यात आज एकही करोनाबाधित रूग्णाच्या मृत्युची नोंद नाही !

६ फेब्रुवारी २०२१ नंतर पुणे शहराला हा दिलासा पहिल्यांदाच मिळाला आहे, असं महापौर म्हणाले आहेत.

(संग्रहित छायाचित्र, महापौर मुरलीधर मोहोळ)

करोना महामारीमध्ये कधीकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरासाठी आजचा दिवस मोठा दिलासा देणारा ठरला. कारण, जवळपास आठ महिन्यानंतर आज पुणे शहरात करोनामुळे एकाही रूग्णांचा मृत्यू झाला नाही. शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

“पुण्यात आज एकही करोनाबाधित मृत्युची नोंद नाही !, पुणे मनपा हद्दीत करोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही करोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. ६ फेब्रुवारी २०२१ नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळालाय.” असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आज पूर्णपणे ओसरताना दिसत आहे. कारण, दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत आता मोठ्याप्रमाणावर घट झाली आहे. शिवाय, करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. करोनाबाधित रूग्णांची दररोजच्या मृत्यू संख्या देखील घटली आहे. 

करोना महामारी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच मुंबईत दिवसभरात करोनामुळे एकही मृत्यू नाही!

रविवारी मुंबईत देखील करोना महामारीनंतर पहिल्यांदाच दिवसभरात एकाही करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला नव्हता. निश्चितच ही बाब दिलासादायक आहे. कारण, करोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबई, पुणे या दोन्ही प्रमुख शहरांमध्ये दररोज मोठ्याप्रमाणावर करोनाबाधित रूग्ण आढळण्याबरोबरच, रूग्णांच्या मृत्युंची देखील नोंद होत होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: There is no record of death of any corona patient in pune today msr

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या