मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कांदा, बटाटा, शेवगा, वालवर, पापडी या फळभाज्यांच्या दरात टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (९ ऑक्टोबर) राज्य; तसेच परराज्यांतून ११० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी घाऊक बाजार बंद होता तसेच शनिवारी (८ ऑक्टोबर) बाजार साप्ताहिक सुट्टीमुळे बंद होता. घाऊक बाजार दोन दिवस बंद असल्याने रविवारी फळभाज्यांची आवक वाढली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १४ ते १५ ट्रक हिरवी मिरची, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो कोबी, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, इंदूरहून ४ ते ५ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ८ ते १० ट्रक लसूण, गुजरातमधून ४ ते ५ टेम्पो भुईमुग शेंग, आग्रा, इंदूरमधून मिळून ४० ते ५० ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा >>>पुणे : कोजागरीनिमित्त पुण्यातील उद्याने आज रात्री दहापर्यंत खुली

India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
The debut of Bharti Hexacom itself gave investors a return of 43 percent
‘भारती हेक्साकॉम’चा पदार्पणालाच गुंतवणूकदारांना ४३ टक्क्यांचा परतावा
Hero MotoCorp sales
बाकी कंपन्यांची उडाली झोप, Hero ची बाजारपेठेत ‘हिरोगीरी’; विक्रीत मोठी वाढ, बाईक खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा
A decrease in the supply of new houses was recorded in eight metros of the country print news
नवीन घरांच्या पुरवठ्यात घट, यंदा पहिल्या तिमाहीत ६९ हजारांवर; गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के कमी

पुणे विभागातून सातारी आले १००० ते १२०० गोणी, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ७ ते ८ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो आठ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, शेवगा २ टेम्पो, मटार १०० गोणी, कांदा ७० ते ८० ट्रक अशी आवक झाली.

पालेभाज्यांच्या दरात घट
गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांचे दर तेजीत होते. पावसामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला होता. रविवारी घाऊक बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली. त्यामुळे पालेभाज्यांच्या दरात घट झाली. मात्र,मागणी चांगली असल्याने मेथी आणि कोथिंबिरीचे दर तेजीत आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीचे दर २० ते ३० रुपये आहेत. मेथीच्या एका जुडीचे दर २५ ते ३० रुपये आहेत. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात काेथिंबिरीच्या दोन लाख जुडी; तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली.

हेही वाचा >>>पुणे : करोना काळात कर्तव्यावर असताना मृत झालेल्यांचे स्मारक

चिकू, सीताफळ, पपई, खरबूज, कलिंगडाच्या दरात वाढ

फळबाजारात कलिंगड, सीताफळ, पपई, चिकू, खरबूजच्या दरात वाढ झाली. संत्र्याच्या दरात घट झाली आहे. लिंबू, अननस, सफरचंद, पेरू आणि मोसंबीचे दर स्थिर आहेत. फळबाजारात लिंबू दोन ते अडीच हजार गोणी, डाळिंब ३५ ते ४० टन, पपई ८ ते १० टेम्पो, कलिंगड ३ ते ४ टेम्पो, खरबूज १ ते २ टेम्पो, पेरु ८०० ते ९०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), अननस ४ ट्रक, मोसंबी ७० ते ८० टन, संत्री २५ ते ३० टन, सीताफळ ३० ते ३५ टन, चिकू ४०० पेटी अशी आवक झाली, अशी माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>>‘ई-चावडी’द्वारे घरबसल्या कर भरण्याची सुविधा

फुलांच्या दरात मोठी घट
नवरात्रोत्सवामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली होती. नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर फुलांच्या दरात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातून फुलांची आवक वाढली असल्याची माहिती फूल व्यापारी सागर भोसले यांनी दिली. कोजागरी पौर्णिमेमुळे रविवारी फुलांना चांगली मागणी होती.