पुणे : ओैंधमध्ये एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड, मनगटी घड्याळ असा सात लाख ६३ हजारांचा ऐवज लांबविला.

याबाबत राधेश्याम बोयल (वय ५९, रा. महेश पॅरेडाइज, डीपी रस्ता, ओैंध) यांनी चतु:शृंगी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोयल यांची सदनिका बंद होती. मध्यरात्री सोसायटीत शिरलेल्या चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी कपाटातील ६० हजारांची रोकड, हिरेजडित सोन्याचे दागिने, महागडे मनगटी घड्याळ असा सात लाख ६३ हजारांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर बोयल यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके तपास करत आहेत.

घोरपडे पेठेत चोरी

घोरपडे पेठेतील एका घरातून चोरट्यांनी दोन लाख दहा हजारांचे दागिने लांबविले. याबाबत एका महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला घोरपडे पेठेतील सोनवणे इमारतीमध्ये राहायला आहेत. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने ऐवज लांबविला. चोरटा माहीतगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव तपास करत आहेत.