scorecardresearch

येरवडा पोलिसांनी जप्त केलेल्या मोटार, दुचाकींचे टायर चोरीला

चोरट्यांनी वाहतूक विभागाच्या कार्यालयात ठेवलेली एक मोटार आणि दोन दुचाकींचे टायर लांबविले. पोलीस अंकुश डोंबाळे तपास करत आहेत.

thief stolen bike tyres pune
येरवडा पोलिसांनी जप्त केलेल्या मोटार, दुचाकींचे टायर चोरीला (प्रातिनिधिक संग्रहित छायाचित्र)

पुणे : येरवड्यातील वाहतूक पोलीस विभागाच्या आवारात शिरलेल्या चोरट्यांनी मोटार, तसेच दोन दुचाकींचे टायर लांबविल्याची घटना उघडकीस आली.

हेही वाचा – पोलिसांच्या घरात चोरट्यांच्या डल्ला; विश्रांतवाडी पोलीस वसाहतीत घरफोड्या

हेही वाचा – प्रस्तावित वीज दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन; बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा इशारा

याबाबत पोलीस कर्मचारी सावता माळी यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माळी येरवडा पोलीस ठाण्यात मुद्देमाल कक्षात कारकून आहेत. गोल्फ क्लब रस्त्यावर वाहतूक विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या आवारातील मोकळ्या जागेत येरवडा पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांत ताब्यात घेतलेली वाहने लावली आहेत. चोरटे वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत शिरले. चोरट्यांनी वाहतूक विभागाच्या कार्यालयात ठेवलेली एक मोटार आणि दोन दुचाकींचे टायर लांबविले. पोलीस अंकुश डोंबाळे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 18:49 IST
ताज्या बातम्या