पुणे : येरवडा भागात लूटमार करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले. चोरट्यांकडून मोबाइल संच आणि दुचाकी जप्त करण्यात आली. साजीद दिलावर सय्यद (वय २१), राजन रघुनाथ लावंड (वय २०), ओम विनोद भंडारी (वय २१, तिघे रा. माळवाडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. येरवडा भागात कामावरुन जात असलेल्या एका तरुणाला अडवून त्याच्याकडील मोबाइल संच आणि रोकड असलेले पाकिट चोरट्यांनी हिसकावून नेले होते. या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. आरोपी हडपसर भागात असल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा माग काढला. सय्यद, लावंड, भंडारी यांना अटक करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, प्रदीप सुर्वे, दत्ता शिंदे, गणपत थिकोळे, किरण घुटे, तुषार खराडे, अमजद शेख आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thieves caught yerawada area police confiscated pune print news ysh
First published on: 04-07-2022 at 16:08 IST