लोणावळ्यातील सहारा पूल भागात युगुलाला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एका महाविद्यालयीन युवकाने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महाविद्यालयीन युवक आणि त्याची मैत्रीण सहारा पूल परिसरात फिरायला गेले होते. त्या वेळी तीन चोरट्यांनी युवकाला चाकूचा धाक दाखविला. युवकावर चाकूचा वार करून त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावला. त्यानंतर चोरट्यांनी युवतीच्या गळ्यातील साेनसाखळी हिसकावली. महागडा मोबाइल संच, सोनसाखळी, चांदीची अंगठी असा एक लाख १२ हजार ४०० रुपयांचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले.

Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी
Pune, Hinjewadi IT Park, Leopard Sighted, cub Rescued, Sugarcane Field, forest department, marathi news,
पुणे : हिंजवडी आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर नवजात बछड्या ताब्यात
social activists demand that hunger strike in front of social welfare office demanding administrator at ashram school
वस्तीगृहात २४० निवासी विद्यार्थी दाखवा अन लाखाचे बक्षीस मिळवा; उपोषणकर्त्यांचे थेट संचालकांनाच आव्हान…

हेही वाचा – ‘एबेल: २२५६’ आकाशगंगा समूहातील रेडिओ प्रारणांचा जीएमआरटीद्वारे वेध, आंतरराष्ट्रीय संशोधन गटाचे संशोधन

हेही वाचा – “भाजपाचा प्रस्ताव काय येतो, त्यावर आपण बोलू”; कसबा पोटनिवडणुकीवर नाना पटोलेंचे विधान

लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरेखा शिंदे तपास करत आहेत.
दरम्यान, लोणावळ्यातील टेबल लँड परिसरात एका तरुणावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना घडली. चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात अमित सलेंदर चौरसिया (वय २८, सध्या रा. पांगोळी, लोणावळा, मूळ रा. सिहटीकर, उत्तर प्रदेश) जखमी झाला आहे. चौरसिया टेबल लँड परिसरातील लोहमार्गाजवळून निघाला होता. त्यावेळी चोरट्यांनी त्याला अडवले. पुढे जायचे नाही, असे सांगून त्याला मारहाण केली. त्याच्यावर चाकूने वार करून चोरटे पसार झाले.