पुणे : लोणी काळभोर भागातील एका बंगल्यात शयनगृहात छुप्या पद्धतीने तयार केलेल्या तिजोरीतून चोरट्यांनी १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबत स्टीफन व्हिक्टर वलेरयण लासराडो (वय ५१, रा. कोळस वस्ती रस्ता, लोमी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मूळचे बंगळुरुचे असलेले स्टीफन कुवेतमध्ये नोकरी करतात. त्यांनी लोणी काळभोर भागात बंगला बांधला आहे. बंगल्यातील शयनगृहातील त्यांनी फरशीखाली तिजोरी केली होती. शयनगृहातील पलंगाखाली असलेल्या फरशीखाली ही तिजोरी होती. तिजोरीत सोन्याचे दागिने त्यांनी ठेवले होते. बंगला बांधताना त्यांनी ही खास तिजोरी केली होती. दोन दिवसांपूर्वी बंगला बंद होता. बंगल्याचे कुलूप तोडून चोरेट आत शिरले.

पलंगाखाली पुरलेल्या तिजोरीतून चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरुन नेले. कुवेतमध्ये नोकरी करणारे स्टीफन यांनी आणलेले सोन्याचे दागिने कुवेतमधून आणले होते. त्यांनी आणलेले दागिने नियमानुसार आणले होते. पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव तपास करत आहेत. स्टीफन यांच्या बंगल्यात चाेरी करणारे चोरटे माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Story img Loader