पुणे : लग्नघरात चोरी; अकरा लाखांचा ऐवज लंपास ; गणेश पेठेतील घटना

चोरट्यांनी शेख यांच्या सदनिकेच्या बाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तसेच चित्रीकरण साठवणारे डीव्हीआर यंत्रही चोरुन नेल्याचे पोलिसांनी सांगितले

प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : लग्नघरातून चोरट्यांनी दहा लाखांची रोकड तसेच दागिने असा दहा लाख ८२ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना मध्यभागातील गणेश पेठेत घडली. सदनिकेच्या बाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी चोरल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत मोहम्मद शेख (वय ४३, रा. एसआरए इमारत, नाडेगल्ली, गणेश पेठ) यांनी या संदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख यांचा भंगार माल खरेदीचा व्यवसाय आहे. शेख यांच्या भाच्याचा विवाह असल्याने त्यांनी घरातील कपाटात दहा लाख २५ हजारांची रोकड ठेवली होती. लग्नाच्या खरेदीच्या गडबडीत शेख कुटुंबीय होते. चोरट्यांनी शेख यांच्या सातव्या मजल्यावरील सदनिकेचे कुलुप तोडले. कपाटातील दहा लाख २५ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने असा दहा लाख ८२ हजारांचा ऐवज लांबविला. चोरट्यांनी शेख यांच्या सदनिकेच्या बाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तसेच चित्रीकरण साठवणारे डीव्हीआर यंत्रही चोरुन नेल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thieves stole rs 10 lakh cash and jewellery from the wedding house in pune zws

Next Story
मोटारीच्या धडकेने एकाचा मृत्यू; मद्यपी मोटारचालक अटकेत ; वारजे भागात अपघात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी