पुणे : करोना बाधितांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने महाविद्यालये-विद्यापीठे बंद करून ऑनलाइन पद्धतीने अध्यापन आणि परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, जवळपास ३० टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप परीक्षा अर्ज भरले नसल्याचे स्पष्ट झाले आहेत.

महाविद्यालये, विद्यापीठे सुरू झाल्याने विद्यापीठाकडून ऑफलाइन परीक्षांचा विचार करण्यात येत होता, तर अध्यापन ऑनलाइन झाल्याने परीक्षाही ऑनलाइनच घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यामुळे परीक्षा पद्धत ठरवण्यासाठी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी समिती नियुक्त केली. या समितीने अंतिम वर्ष आणि विषम सत्राच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने आणि अन्य वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची शिफारस केली. मात्र गेल्या काही दिवसांत करोना बाधितांचे प्रमाण वाढू लागल्याने विद्यापीठाने सावधगिरीची भूमिका घेत शासनाच्या नव्या निर्बंधांची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्य शासनाने महाविद्यालये, विद्यापीठे बंद करून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा, अध्यापन करण्याचे निर्देश दिले.

Why is mobbing experienced again and again in universities
विद्यापीठांमध्ये पुन्हा पुन्हा झुंडशाही का अनुभवाला येते आहे?
rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात

विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडून परीक्षा अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी १५ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे. मात्र सुमारे ३० टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप अर्जच भरलेले नाहीत. येत्या काही दिवसांत विद्यापीठाकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन

महाविद्यालये, विद्यापीठांतील ऑनलाइन शिक्षण परीक्षांबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. परीक्षा व्यवस्थितरीत्या पार पाडण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी त्यांच्या संकेतस्थळावर परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना, प्रश्नसंच, हेल्पलाइन क्रमांकची माहिती उपलब्ध करून द्यावी. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी, शंकाचे निरसन करण्यासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी हेल्पलाइनची व्यवस्था करावी. परदेशी विद्यार्थी, प्रयोगशाळांमध्ये संशोधन करीत असलेले विद्यार्थी, पीएचडीचे विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची परवागनी देण्यात यावी. तसेच स्थानिक प्राधिकरणांना कोवीड सेंटर म्हणून वसतिगृहांची आवश्यकता असल्यास ती उपलब्ध करून देण्यात यावीत. अद्याप लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांची यादी स्थानिक प्राधिकरणांना देऊन विशेष मोहीम राबवून लसीकरण पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के असावी. चक्राकार पद्धतीने त्यांच्या कार्यालयीन उपस्थिती, घरातून कामकाज करण्याचे नियोजन विद्यापीठाने करावे असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडून परीक्षेच्या वेळापत्रकाचे काम सुरू आहे. मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज वेळेत भरणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरून कायम करावेत.

डॉ.महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ