scorecardresearch

Premium

यंदा गणेश विसर्जनाला मुठा नदी कोरडी, खडकवासला धरणातून पाणी न सोडण्याचा निर्णय

यंदा गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाणार नसल्याची स्पष्टोक्ती जलसंपदा विभागाकडून मंगळवारी करण्यात आली.

Mutha River is dry for Ganesh Visarjan
सध्या सिंचन आवर्तन सुरू असल्याने खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणांत मिळून १०० टक्के पाणीसाठा झालेला नाही. शहर आणि परिसरात गेले काही दिवस पाऊस हजेरी लावत असला, तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत नसल्याने यंदा गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाणार नसल्याची स्पष्टोक्ती जलसंपदा विभागाकडून मंगळवारी करण्यात आली.

Fodder for animals Pangri
नाशिक : पाण्यासह जनावरांसाठी आता चारा उपलब्ध, पांगरीतील गंभीर समस्येवर पालकमंत्र्यांची सूचना
flooding Kanhan river, water supply affected Nagpur
कन्हान नदीला पूर, नागपूरच्या पाणी पुरवठ्यावर काय होणार परिणाम?
people drowned
वर्धा: बैलजोड़ी धुण्यासाठी गेले अन् पाण्यात बुडाले, पोळ्याच्या धामधुमीत बापलेकाचा मृत्यू
pest-on-Soybean
सोयाबीनवर किड, बळीराजा संकटात; उत्पादनात घट होण्याची भीती

यंदा विलंबाने सक्रीय झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या अखेरीस चांगली सुरुवात केली. त्यानंतर दडी मारलेला पाऊस जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सक्रीय झाला. त्यानंतर संपूर्ण ऑगस्ट महिन्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात विशेष पावसाने हजेरी लावली नाही. शहराला पाणीपुरवठा करणारी टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमधून यंदा मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्गही करण्यात आलेला नाही. सध्या वरसगाव आणि पानशेत धरणे १०० टक्के भरली आहेत, तर खडकवासला धरणात ७९ टक्के, तर टेमघर धरणात ७७ टक्के पाणीसाठा आहे.

आणखी वाचा-‘सायन्स काँग्रेस’मधून केंद्र सरकार बाहेर; पुढील वर्षी होणाऱ्या संमेलनाला सहकार्यास नकार 

दरवर्षी या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होतो. त्यामुळे शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. तसेच या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे चारही धरणे भरून मुठा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. हे पाणी पुढे जाऊन उजनी धरणाला मिळते. दरवर्षी गणेश विसर्जनापर्यंत चारही धरणे १०० टक्के भरतात. त्यामुळे खडकवासला धरणातून नवीन मुठा उजवा कालव्यात आणि मुठा नदीत गणेश विसर्जनासाठी पाणी सोडण्यात येते. यंदा तशी परिस्थिती नसल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार नसल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. सध्या सिंचन आवर्तन सुरू असल्याने खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This year mutha river is dry for ganesh visarjan decision not to release water from khadakwasla dam pune print news psg 17 mrj

First published on: 27-09-2023 at 10:05 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×