पुण्यातील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत यंदा ढणढणाटाने अतिधोकादायक पातळी गाठली, असल्याचे निरीक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तंत्रशास्त्र विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. शनिवारा, सकाळी ८ वाजल्यानंतर शरातील काठी भागातील ध्वनिपातळी १२८.५ डेसिबलवर पोहोचली. ही पातळी अतिधोकादायक समजली जाते. राज्य शासनाच्या आदेशानुसार यावर्षीच्या मिरवणुकीत सर्वच शासकीय यंत्रणांनी नरमाईचे धोरण स्वीकारले. त्याचा परिणाम आवाजाचा अतिरेक होऊन कानठळ्या बसवणाऱ्या ध्वनीने सारा परिसर दुमदुमून गेला.

हेही वाचा : पिंपरी: लाचखोर वाहतूक पोलीस, वॉर्डन गजाआड ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

शनिवारी सकाळी आठ नंतर खंडूजी बाबा चौकातील ध्वनिपातळीने अतिधोकादायक स्तर गाठल्याचे या अहवालात नोंदवण्यात आले आहे. याच ठिकाणी दि. ९ रोजी सायंकाळी चार वाजता ध्वनिपातळी सर्वात कमी म्हणजे ६४ डेसिबल असल्याचे या पाहणीत आढळून आले होते. या पाहणीसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवक सुयोग लोखंड, जयवंत नांदोडे, तन्मय पाठक, सर्वेश कोळेकर. शिवकुमार वारकड व योगेश श्रीरसागर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.