scorecardresearch

Premium

पुणे: ऑनलाइन ॲपवर झालेली ओळख महागात; महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करुन अनैसर्गिक कृत्य

याबाबत एका २१ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

three accused abducted college youth committed unnatural act threatened youth pune
ऑनलाइन ॲपवर झालेली ओळख महागात;महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करुन अनैसर्गिक कृत्य (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लाेकसत्ता प्रतिनिधी

पुणे: ऑनलाइन ॲपवरुन झालेली ओळख महाविद्यालयीन तरुणाला महागात पडली. तरुणाला आमिष दाखवून त्याचे ससून रुग्णालय परिसरातून अपहरण करण्यात आले. भाेसरी परिसरात तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याशी तिघांनी अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर आरोपींनी तरुणाला धमकावून त्याच्याकडील २८ हजार ५०० रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली.

model degree college buldhana, 83 crores sanctioned for model degree college buldhana
बुलढाणा : ‘मॉडेल डिग्री’ महाविद्यालयासाठी ८३ कोटी मंजूर; उपकेंद्र कार्यान्वित होण्याची चिन्हे
viral bihar school story
माजी विद्यार्थ्याचा अनोखा पराक्रम! ज्या शाळेत शिकले त्याच शाळेची जमीन विकली, संपूर्ण प्रकरण वाचून डोकंच धराल
Pune-University-sub-centre-building
पुणे विद्यापीठ उपकेंद्र इमारतीचा विस्तार गरजेचा, सागर वैद्य यांचा कुलगुरूंना प्रस्ताव
garbage
बेकायदा कचराभूमीमुळे विद्यार्थी हैराण; बोईसरमध्ये दुर्गंधीमुळे ३० विद्यार्थ्यांना मळमळ, उलटीचा त्रास

याबाबत एका २१ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण तळेगाव दाभाडे येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. एका ॲपवरुन तरुणाची आरोपींशी ओळख झाली होती. आराेपींनी त्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. त्याला पुणे स्टेशन परिसरात भेटण्यास बाेलावले. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारजवळ तरुणाला माेटारीत बसण्यास सांगितले. फिरायला जाऊ असे सांगून आराेपींनी त्याला माेटारीतून भाेसरी एमआयडीसी परिसरात नेले.

हेही वाचा… पोलिसांचे ‘कानावर हात’

भाेसरी एमआयडीसी परिसरात निर्जन जागी आरोपींनी त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. तरुणाला धमकावून ऑनलाइन पद्धतीने त्याच्या खात्यातील २८ हजार ५०० रुपये काढून घेतले. त्यानंतर तरुणाला साेडून तिघेजण माेटारीतून पसार जाले. पाेलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three accused abducted a college youth and committed an unnatural act also threatened the youth in bhosari pune print news rbk 25 dvr

First published on: 03-10-2023 at 15:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×