scorecardresearch

पुणे : नदीपात्रातील खुनाचा उलगडा ,मामे भावाकडून तरुणाचा खून ; तिघे गजाआड

भिडे पुलाजवळ नदीपात्रातील मोकळ्या जागेत झालेल्या तरुणाचा खुनाचा छडा डेक्कन पोलिसांनी लावला.

पुणे : नदीपात्रातील खुनाचा उलगडा ,मामे भावाकडून तरुणाचा खून ; तिघे गजाआड
संग्रहित छायाचित्र

भिडे पुलाजवळ नदीपात्रातील मोकळ्या जागेत झालेल्या तरुणाचा खुनाचा छडा डेक्कन पोलिसांनी लावला. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. मामेभावाने साथीदारांशी संगनमत करून तरुणाचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.नरेश गणेश दळवी (वय ३०), अजय शंकर ठाकर (वय २५), समीर कैलास कारके (वय २६, रा. सर्व. उर्से. ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गणेश सुरेश कदम (वय ३५, रा. अमृतेश्वर मंदिराजवळ, शनिवार पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. आरोपी नरेश गणेश कदमाचा मामेभाऊ आहे. कदम याचा लॉन्ड्री व्यवसाय आहे. सोमवारी (२६ सप्टेंबर) दुपारी भिडे पुलाजवळ नदीपात्रात कदम मृतावस्थेत पडला होता. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते. डेक्कन पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तसेच तांत्रिक तपासात आरोपी उर्से परिसरातील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून दळवी, ठाकर, कारके यांना ताब्यात घेतले. दळवी आणि कदम यांच्यात वाद झाला होता.

हेही वाचा >>> पुणे : रस्ते सुशोभीकरणासाठी पंधरा कोटींच्या खर्चाला मान्यता

दळवीने कदमला नदीपात्रात दारू पिण्यासाठी बोलावले होते. दळवी आणि साथीदारांनी कदम याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. कदम याच्या खून प्रकरणात आणखी काही जण सामील आहेत का, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक आयुक्त रमाकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, सहायक निरीक्षक कल्याणी पाडोळे, उपनिरीक्षक गणेश मोरे, दत्तात्रय सावंत, नीलेश पाटील, हवालदार धनश्री सुपेकर, शेखर कोटकर, राम गरूड, रोहित मिरजे, गणेश तरंगे आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या

व्हिडिओ