scorecardresearch

खळबळजनक : पुण्यातील हडपसरमध्ये कालव्यात आढळले तीन मृतदेह

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविले आहेत

( संग्रहीत छायाचित्र)

हडपसरमधील कालव्यात तीन मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली. कालव्यात सापडलेल्या मृतांची रात्री उशीरापर्यंत ओळख पटू शकली नाही.

हडपसरमधील शिंदे वस्ती परिसरात कालव्यात एक मृतदेह तसेच वैदुवाडी परिसरात दोन मृतदेह वाहून आल्याची माहिती रहिवाशांनी पोलीस तसेच अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

हडपसर भागातील जीवरक्षक बच्चूसिंग टाक, आझादसिंग टाक आणि जवानांनी कालव्यातून तीन मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविले असून मृतांची रात्री उशीरापर्यंत ओळख पटू शकली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three bodies found in a canal in hadapsar pune pune print news msr

ताज्या बातम्या