पुणे : जंगली महाराज रस्त्यावर फुगे विक्री करणाऱ्या महिलेची तीन मुले बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आयना शंकर काळे (वय ३५) हिने डेक्कन पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आयना काळे जंगली महाराज रस्त्यावर फुगे विक्री करुन उदरनिर्वाह करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिची मुले जनाबाई (वय १०), दत्तू (वय ७), आरती (वय ५) फुगे विक्री करुन आईला मदत करतात. जनाबाई, दत्तू, आरती बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर आयनाने पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आयना मुलांना दोन दिवसांपूर्वी ओरडली होती. आई रागावल्याने मुले बेपत्ता झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांकडून काळे आणि तिच्या नातेवाईकांची चौकशी करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three children selling balloons on jungli maharaj street missing kidnapping case pune print news rbk 25 ysh
First published on: 04-02-2023 at 15:52 IST