scorecardresearch

Premium

पुणे: आळे फाटा परिसरात मोटारीच्या धडकेने तीन शेतमजुरांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

जगदीश महेंद्रसिंह डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

three farm laborers die car collision Ale Fata area, Pune Two laborers injured
आळे फाटा परिसरात मोटारीच्या धडकेने तीन शेतमजुरांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक (संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: कल्याण-नगर मार्गावर आळेफाटा परिसरात भरधाव मोटारीने पाच परप्रांतीय शेतमजुरांना धडक दिली. अपघातात तिघांचा मृत्यू झाला. अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

thane accident, father dies in thane accident, son injured father dies in accident
ठाणे : अपघातात वडिलांचा मृत्यू तर मुलगा जखमी
fire (1)
VIDEO: बंगळुरूमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, १२ जणांचा होरपळून मृत्यू
century rayon , Century Rayon Company , tanker explosion in Ulhasnagar
उल्हासनगरात टँकरच्या स्फोटात चौघांचा मृत्यू; सेंच्युरी रेयॉन कंपनीतील घटना
Two children die due to dengue-like illness
चिखलीत डेंग्यूसदृश आजाराने दोन चिमुकल्यांचा मृत्यू

जगदीश महेंद्रसिंह डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेजण मूळचे मध्यप्रदेशातील आहेत. दिनेश जाधव, विक्रम तारोले गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डावर, मांजरे, तारोले, जाधव शेतमजूर आहेत. ते मजुरीसाठी आळेफाटा परिसरात आले होते. रविवारी रात्री (२४ सप्टेंबर) साडेआठच्या सुमारास ते कल्याण-नगर मार्गावरील कठेश्वर पुलावरुन निघाले होते. पुलाच्या परिसरात अंधार होता. भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली.

हेही वाचा… राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘सध्या देशात असत्याचा मार्ग अवलंबून राजकीय अस्थिरता…’

अपघातात डावर, मांजरे, तारोले, जाधव गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन कांडगे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या मजुरांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच डावर, मांजरे, तारोले यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three farm laborers die in car collision in ale fata area pune two laborers seriously injured pune print news rbk 25 dvr

First published on: 25-09-2023 at 09:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×