Three lakhs robbery from the party wedding ceremony Incident office on Pune Satara road pune print news ysh 95 | Loksatta

विवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाखांचा ऐवज लंपास; पुणे-सातारा रस्त्यावरील कार्यालयातील घटना

विवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाख रुपयांचा ऐवज असलेली पिशवी चोरट्यांनी लांबविल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात घडली.

विवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाखांचा ऐवज लंपास; पुणे-सातारा रस्त्यावरील कार्यालयातील घटना
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

पुणे : विवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाख रुपयांचा ऐवज असलेली पिशवी चोरट्यांनी लांबविल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात घडली. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेच्या मुलाचा विवाह समारंभ नुकताच सातारा रस्त्यावरील वाळवेकर लाॅन मंगल कार्यालयात पार पडला. तक्रारदार महिलेने दागिने, रोकड असलेली पिशवी खुर्चीवर ठेवली होती. नातेवाईकांची भेटगाठ त्या घेत होत्या. त्या वेळी चोरट्यांनी खुर्चीवर ठेवलेली पिशवी लांबविली. पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 16:23 IST
Next Story
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन