scorecardresearch

लष्करी जवानाच्या घरातून पावणेतीन लाखांचा ऐवज लांबविला

वंगवाल येरवड्यातील आगाखान पॅलेस परिसरातील लष्कराच्या डंकर्स लाईन वसाहतीत राहायला आहेत.

लष्करी जवानाच्या घरातून पावणेतीन लाखांचा ऐवज लांबविला
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

पुणे : लष्करातील जवानाच्या घरातून चोरट्यांनी दोन लाख ८५ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना येरवडा भागात घडली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नायब सुभेदार हेमंतकुमार भरोसाराम वंगवाल (वय ४७) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वंगवाल येरवड्यातील आगाखान पॅलेस परिसरातील लष्कराच्या डंकर्स लाईन वसाहतीत राहायला आहेत.

बंगवाल यांच्या तुकडीतील नायब सुभेदार शामल सामंता गोवा येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. सामंता यांची पत्नी कोलकाता येथे गेले होते. सामंता यांचे घर बंद होते. चोरट्यांनी सामंता या घराचे कुलुप तोडले. कपाटातील दोन लाख ८५ हजार रुपयांचे दागिने लांबविले. सामंता यांच्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर वंगवाल यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या