scorecardresearch

अन्नातून विषारी ओैषध; श्वानाच्या तीन पिलांचा मृत्यू; वारजे भागतील घटना

अन्नपदार्थातून विषारी ओैषध दिल्याने श्वानाच्या तीन पिलांचा मृत्यू झाल्याची घटना वारजे भागात घडली.

अन्नातून विषारी ओैषध; श्वानाच्या तीन पिलांचा मृत्यू; वारजे भागतील घटना
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

पुणे : अन्नपदार्थातून विषारी ओैषध दिल्याने श्वानाच्या तीन पिलांचा मृत्यू झाल्याची घटना वारजे भागात घडली. या प्रकरणी वारजे पोलिसांनी एकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत प्राणीमित्र अनिकेत संजय राजपूत (वय २८, रा. भागिरथीनगर, वारजेमाळवाडी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्राण्यांना क्रुरतेने वागणूक दिल्या प्रकरणी नागेश सोनवणे (रा. सिद्धार्थ चौक, रामनगर, वारजे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे भागातील सिद्धार्थ चौक परिसरात बापू घनगावकर यांच्या मोकळ्या जागेत श्वानांच्या पिलांचा वावर होता. श्वानांच्या तीन पिलांना अन्नपदार्थातून उंदीर मारण्याचे ओैषध देण्यात आले. तीन श्वानांचा मृत्यू झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. सोनवणे याने श्वानांच्या पिलांना विषारी ओैषध दिल्याची माहिती प्राणीमित्र राजपूत यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी याबाबत तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 10:28 IST