धक्कादायक : युट्युबवरील व्हिडिओ पाहून तीन वर्षीय चिमुकलीवर भावाकडूनच लैंगिक अत्याचार!

या प्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

crime-13
(प्रातिनिधीक फोटो)

पिंपरी-चिंचवडमध्ये भाऊ आणि बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सख्ख्या अल्पवयीन भावाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलाने युट्युबवर अश्लील व्हिडिओ पाहून अत्याचार केल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी मुलाला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब हे परराज्यातील आहे. पीडित चिमुकली आणि मुलाचे आई-वडील हे पोट भरण्यासाठी घराबाहेर जाऊन काम करतात तर तीन वर्षीय मुलीचा सांभाळ तिचा भाऊ करत होता. दरम्यान, वडिलांकडे असलेल्या मोबाईलमध्ये मुलगा अश्लील व्हिडिओ बघत असे असे पोलिसांनी सांगितले आहे. यातूनच ऑगस्ट महिन्यात घरात कोणी नसताना आपल्या तीन वर्षीय बहिणीवरच त्याने लैंगिक अत्याचार केले. त्याच महिन्यात आईला करोनाची बाधा झाल्याने त्या त्यांच्या मूळगावी गेल्या होत्या. तिथे मुलीची तब्येत बरी नसल्याने त्या तेथील डॉक्टरांकडे गेल्या. दरम्यान, डॉक्टरांनी औषध उपचार करून पाठविले. काही दिवसांनी त्या पिंपरी-चिंचवडमध्ये परतल्या, तेव्हा देखील मुलीची तब्बेत बरी नव्हती. त्यामुळे शासकीय रुग्णालयात तिला दाखवण्यात आले, तेव्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आले.“भैयाने गंदा काम किया”.. अस वारंवार चिमुकली म्हणत असल्याने मुलावर संशय बळावला. अखेर त्याला विश्वासात घेऊन पोलिसांनी विचारलं असता हे कृत्य त्यानेच केले असल्याचं तपासात समोर आले आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three year old girl sexually abused by her brother after watching a video on youtube msr 87 kjp

Next Story
“स्मशानभूमीच्या उद्घाटनाला चला म्हटलं की मला थोडी भीतीचं वाटते, कारण…”, असं म्हणत फडणवीसांनी सांगितला ‘तो’ किस्सा!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी