scorecardresearch

Premium

पुण्यातील तीन युवा कलाकारांची ऑस्ट्रियातील संगीत कार्यक्रमासाठी निवड

या कार्यक्रमासाठी भारतभरातील २७ युवा वादक आणि गायकांची निवड करण्यात आली असून, त्यात पुण्यातील रुचिर इंगळे, इरावती जोशी, अंतरा बापट यांची निवड झाली आहे.

three young artists pune selected music program vienna austria
पुण्यातील तीन युवा कलाकारांची ऑस्ट्रियातील संगीत कार्यक्रमासाठी निवड (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: भारत आणि ऑस्ट्रिया यांच्या राजकीय मैत्रीपूर्ण संबंधांची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे १७ जूनला संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी भारतभरातील २७ युवा वादक आणि गायकांची निवड करण्यात आली असून, त्यात पुण्यातील रुचिर इंगळे, इरावती जोशी, अंतरा बापट यांची निवड झाली आहे.

huge employees crowd in pension court of guardian minister mangal prabhat lodha
‘रामलीला’साठी मैदानांचे भाडे निम्म्यावर; अग्निशमन शुल्कही माफ, लोढा यांचे निर्देश 
Inspection of pedha sellers at Saptashringa fort
सप्तश्रृंग गडावर पेढे विक्रेत्यांची तपासणी
OBC agitator ravindra Tonge
ओबीसी आंदोलनकर्ते टोंगे यांची प्रकृती चिंताजनक, तातडीने रुग्णालयात हलविले
arrested
आखाती देशात पुण्यातील महिलांची विक्री प्रकरण : मुख्य दलालाला मुंबईतील माहिममधून अटक

इंडियन नॅशनल युथ ऑर्केस्ट्रा अँड कोरस आणि व्हिएन्ना युनिव्हर्सिटी फिलहार्मोनिक यांच्यातर्फे संगीतकार कार्ल ऑर्फ यांनी संगीतबद्ध केलेला कार्मिना बुराना हा संगीत कार्यक्रम होणार आहे. १७ जूनला व्हिएन्ना येथील सादरीकरणानंतर भारतात लखनऊ येथे २९ ऑक्टोबरला आणि नवी दिल्ली येथे ३१ ऑक्टोबरला हा कार्यक्रम सादर होणार आहे.

हेही वाचा… पुणे: PMPकडून ‘हे’ ११ मार्ग पुन्हा सुरू

आंतरराष्ट्रीय स्तरावरील या कार्यक्रमासाठी पुण्यातील रुचिर इंगळे, इरावती जोशी, अंतरा बापट यांना व्हायोलिन वादनाची संधी मिळाली आहे. रुचिर, इरावती आणि अंतरा सुझुकी स्कूल ऑफ व्हायोलिनच्या संस्थापिका रमा चोभे यांच्याकडे गेली बारा वर्षे व्हायोलिन वादनाचे धडे घेत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three young artists from pune selected for music program in austria pune print news ccp 14 dvr

First published on: 16-06-2023 at 12:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×