औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील महापारेषणच्या १३२ केव्ही अति उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांसाठी नवीन मनोरे उभारणीचे आणि इतर दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (१ डिसेंबर) सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तसेच रविवारी (४ डिसेंबर) सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत शिवाजीनगर, डेक्कनमधील काही परिसराचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: कोथरुडमधील पतसंस्थेत पावणेदहा कोटींचा अपहार; लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षाला अटक

गणेशखिंड येथे महापारेषणचे १३२ केव्ही अति उच्चदाब उपकेंद्र आहे. या उपकेंद्राला गणेशखिंड ते चिंचवड आणि गणेशखिंड ते रहाटणी या अति उच्चदाब १३२ केव्ही वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र या दोन्ही वीजवाहिन्यांचे मनोरे आणि तारांमुळे औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. तो दूर करण्यासाठी महापारेषण कंपनी आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने नवीन मोनोपोल टॉवर उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>पुणे: विद्यापीठ अधिसभेच्या प्राचार्य गटाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर

दोन टप्प्यांमध्ये नवीन टॉवर उभारणी आणि १३२ केव्ही वीजवाहिन्यांच्या इतर तांत्रिक कामांमुळे महापारेषणच्या गणेशखिंड १३२ केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे महावितरणच्या ११ केव्ही व २२ केव्ही क्षमतेच्या एकूण ३२ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहणार आहेत. यात शिवाजीनगरमधील २८ तर कोथरूड विभागातील ४ वीजवाहिन्यांचा समावेश आहे. त्यामुळे पूर्वनियोजित कामाच्या वेळेत शिवाजीनगर परिसरातील सुमारे ३८ हजार ३०० तसेच डेक्कन व जंगली महाराज रोड परिसरातील सुमारे ८ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा नाईलाजास्तव बंद ठेवावा लागणार आहे.

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवडमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले

पहिल्या टप्प्यात गुरुवारी सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तसेच दुसऱ्या टप्प्यात रविवारी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत शिवाजीनगर आणि डेक्कनच्या काही भागात वीजपुरवठा बंद राहील. यामध्ये फर्ग्युसन रस्ता, वाकडेवाडी, मॉडेल कॉलनी, मोदीबाग, रेंजहिल्स, ई-स्क्वेअर, वडारवाडी, गोखलेनगर, लकाकी रस्ता, सेनापती बापट रस्ता, हनुमाननगर, मंगलवाडी, वेताळबाबा चौक, राजभवन, खैरेवाडी, अशोकनगर, यशवंत घाडगेनगर, पोलीस लाईन वसाहत, घोले रस्ता, शिवाजीनगर गावठाण, काँग्रेस भवन, सावरकर भवन, जिल्हा न्यायालय, कामगार पुतळा, तोफखाना, आयआयटीएम, काकडे मॉल, एसएसपीएमएस, रेव्हेन्यू कॉलनी, आकाशवाणी, सीआयडी वसाहत, संचेती हॉस्पिटल, लक्ष्मी रस्ता, नारायण पेठ, शनिवार पेठ व सदाशिव पेठचा काही भाग, चित्रशाला, आपटे रस्ता, शिरोळे रस्त्याचा अर्धा भाग, जंगली महाराज रस्ता, पुलाची वाडी, छत्रपती चौक, आयएमडीआर कॉलेज, गणेशवाडी या भागांचा समावेश आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thursday sunday power supply off in shivajinagar deccan area pune print news amy
First published on: 29-11-2022 at 23:04 IST