धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन शहरात लागू करण्यात आलेली पाणीकपात शनिवारपासून (२८ जून) लागू होत असून पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पाणीकपातीमुळे संपूर्ण शहराला शनिवारपासून एक वेळ पाणीपुरवठा केला जाईल. मध्य वस्तीतील सर्व पेठांमध्ये सकाळी पाच ते नऊ या वेळेत पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शहरातील पाणीकपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे शहरासाठी जे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे ते शुक्रवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार करण्यात आलेले नियोजन पुढीलप्रमाणे आहे.

स्वारगेट पाणीपुरवठा विभाग-
१) मध्य पुणे, पेठा व परिसर.
मध्य वस्तीतील सर्व पेठा- सकाळी ५ ते ९.
मंगळवार पेठ, गंज पेठ, महात्मा फुले पेठ, सोमवार, रास्ता पेठ, पॉवर हाऊस गुरुवार, भवानी पेठ, काशेवाडी, कसबा पेठ, गुरू नानकनगर, घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी, लोहियानगर, मालधक्का परिसर, कडबा कुट्टी परिसर, राजेवाडी- सकाळी ५ ते ९.
दांडेकर पूल, नवी पेठ, सर्वेक्षण क्रमांक १३३, राजेंद्रनगर, म्हात्रे पूल परिसर, स. प. महाविद्यालय परिसर, रामबाग कॉलनी, लोकमान्यनगर- सकाळी ५ ते ९.
मनपा कॉलनी क्रमांक ८ (गंज पेठ काही भाग), बलवार आळी- सकाळी ११ ते २.
हरकानगर, मनपा कॉलनी क्रमांक ७, १८० घोरपडे पेठ- सायंकाळी ५ ते ८.
गुरुवार पेठ  (अंशत:), घोरपडे पेठ  (अंशत:), शुक्रवार पेठ  (अंशत:)- सायंकाळी ५.३० ते ९.
पानमळा वसाहत, जयदेवनगर, नवश्यामारुती परिसर, गणेश मळा, सर्वेक्षण क्रमांक १३०- सायंकाळी ५.३० ते ९.३०
२) बिबवेवाडी, मार्केट यार्ड, महेश सोसायटी व परिसर.
वसंतबाग, अटल सोसायटी, कोठारी ब्लॉक, मार्केट यार्ड, हमालनगर, इंदिरानगर, महर्षिनगर, डायस प्लॉट, सॅलिसबरी पार्क, ढोलेमळा, श्रेयस सोसायटी, पारिजात सोसायटी, अनिकेत सोसायटी, आंबेडकर वसाहत, धवलगिरी, वास्तुनगर, झाला कॉम्प्लेक्स, केंजळेनगर, रम्यनगरी, पितळेनगर, हाईडपार्क, वैभव सोसायटी, महेश सोसायटी, दामोदरनगर, संत एकनाथनगर, औद्योगिक वसाहत- सकाळी ५ ते ९.
३) चिंतामणीनगर, अप्पर इंदिरानगर व परिसर.
क्रिसेंट हायस्कूल, विष्णू विहार, सूर्यप्रभा गार्डन, चिंतामणीनगर भाग १ व २, अप्पर इंदिरानगर, जागडेवस्ती, बुऱ्हाणी कॉलनी, पितळेनगर, सिटी पार्क, न्यू ईरा सोसायटी, विद्यानगर कॉलनी, गंगाधाम, गगन गॅलेक्सी, महावीर फर्निचर व भाग- दुपारी १२ ते ४.
लुंकड हायलॅन्ड, विद्यानगर कॉलनी, संदेशनगर- सायंकाळी ६ ते ९.
४) लक्ष्मीनगर, म्हाडा वसाहती, शिवदर्शन व परिसर.
म्हाडा वसाहती, लक्ष्मीनगर, पर्वती गावठाण, शिवदर्शन, आंबेडकर वसाहत, संध्या सोसायटी, शिरीष सोसायटी, गवळीवाडा, संजयनगर वसाहत, सारंग सोसायटी, तावरे बेकरी, निर्मलबाग, पर्वती दर्शन- सकाळी ५ ते ९.
५) मित्र मंडळ, संतनगर व परिसर.
वाळवेकरनगर, मित्र मंडळ कॉलनी, वेलणकर कॉलनी, संतनगर, राजर्षी शाहू सोसायटी, महावीर पार्क, सहकारनगर क्रमांक २, मोरेवस्ती- सकाळी १० ते ४.
६) महर्षिनगर व परिसर.
ऋतुराज सोसायटी, मोतीबाग सोसायटी, प्रेमनगर सोसायटी, सुपाश्र्वनाथ सोसायटी, आदर्शनगर सोसायटी, आदिनाथ सोसायटी, महर्षिनगर व परिसर- दुपारी ४ ते ९.
७) सहकारनगर व परिसर.
सहकारनगर क्रमांक १ पोलीस स्टेशन परिसर, गुरुराज सोसायटी, गाडगीळ उद्यान परिसर- सायं. ७ ते १०.
८) मुकुंदनगर, महर्षिनगर, शंकरशेठ रस्ता परिसर- सकाळी ५ ते ९.

Water supply stopped in Goregaon Malad Kandivali on Tuesday
मुंबई : गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद
water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
no water supply in most parts of Pune city on thursday due to repair works
पुणे : शहरात अघोषित पाणीकपात? पेठांचा भागवगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

एसएनडीटी पाणीपुरवठा विभाग-
१) रामबाग कॉलनी, शिवतीर्थनगर परिसर.
रामबाग कॉलनी, काशिनाथ सोसायटी, मोहोळ चौक, मोरे विद्यालय हनुमाननगर- सकाळी ५ ते ९.
एलआयसी व परिसर- सकाळी ७ ते ११.
कानिफनाथ व्हॉल्व्ह १, २, जीवनछाया सोसायटी- सायंकाळी ५.३० ते ९.३०.
रामबाग कॉलनी, माधव बाग, मॉडर्न कॉलनी, जयभवानीनगर, राजा शिवराय प्रतिष्ठान शाळा, शीवतीर्थनगर, न्यू फ्रेन्ड्स कॉलनी- सकाळी ६ ते ११.
किष्किंधानगर, साम्राज्य सोसायटी, कांचनबाग, लीला पार्क, सिल्व्हर क्रेस्ट, रमेश सोसायटी, शेफालिफा ऑर्चिड, मैत्री, आकाशदर्शन, सरस्वती, रोनक, शिवगोरक्ष, गोदाई, लोटस कोर्ट, ऋतुजा, जानकी बळवंत, चिंतामणी सोसायटी- सायंकाळी ५.३० ते ९.३०.
२) सुतारदरा, शास्त्रीनगर व परिसर.
सुतारदरा टाकीचा पाणीपुरवठा होणारा भाग- सकाळी ९ ते १.
सुतारदरा बूस्टरने पाणीपुरवठा होणारा भाग- दुपारी १ ते ३.
सुतारदरा गल्ली क्रमांक १ ते ८- सकाळी ९ ते १२.
सुतारदरा गल्ली क्रमांक २७-२८- दुपारी १२ ते ३.
भारतीनगर, शास्त्रीनगर, गुरुजन सोसायटी, सुरजनगर सोसायटी- पहाटे ४ ते सकाळी ९.
परमहंसनगर चढावरील भाग- सकाळी १० ते २.३०.
सागर कॉलनी ज्ञानेश्वर कॉलनी, संगम चौक परिसर, गणंजय सोसायटी- सकाळी ९ ते ३.
आझादवाडी, वृंदावन सोसायटी, सुतार दवाखाना परिसर- सायंकाळी ५.३० ते ९.३०.
म्हातोबानगर सकाळी ६ ते ८, दुपारी १२ ते ३.
३) बावधन, महात्मा सोसायटी व परिसर.
बावधन, उजवी व डावी भुसारी कॉलनी, भूगाव रस्ता- पहाटे ४ ते १२, सायंकाळी ५ ते ११.३० टप्प्याटप्प्याने.
महात्मा सोसायटी, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर- भागनिहाय सकाळी ५ ते सायंकाळी ७ टप्प्याटप्प्याने.
वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी व परिसर- सकाळी ८.३० ते १.३०.
४) शाहू कॉलनी व परिसर.
शाहू कॉलनी परिसर, गल्ली क्रमांक २ ते ११. ए. जे. अॅव्हेन्यू परिसर- सकाळी ९ ते २.
स्नेहांकित कॉलनी, सरगम कॉलनी, शाहू कॉलनी गल्ली क्रमांक १, गुरुप्रसाद कॉलनी, ऋतुजा परिसर- दुपारी ३ ते ७.
५) तपोधाम, वारजे, सहवास व परिसर.
तपोधाम परिसर, आनंद एकता कॉलनी- सकाळी ५.३० ते १.३०, दुपारी ३ ते ७.
वारजे गावठाण, रामनगर- दुपारी ४ ते सायंकाळी ७.
अहिरेगाव व परिसर- विभागनिहाय सकाळी ७ ते १०, सायंकाळी ६ ते ९.
सहवास सोसायटी, क्षिप्रा सोसायटी, मनमोहन सोसायटी, विठ्ठल मंदिर परिसर, गोसावी वस्ती परिसर- सकाळी ८.३० ते १.३०.
वनदेवी मंदिरासमोरील भाग, गोसावी वस्ती- सकाळी ७ ते ९. सायंकाळी ६ ते ८.
६) कर्वेनगर, गणंजय व परिसर.
कर्वेनगर गल्ली क्रमांक ३ ते ११- सकाळी ९ ते २. गल्ली क्रमांक १, २, आनंद कॉलनी- सकाळी ६ ते ९. दुपारी ३ ते ४.३०. मावळे आळी, कामना वसाहत- सकाळी ६ ते ९. कर्वेनगर गावठाण- सायंकाळी ६ ते ८.३०. गणंजय सोसायटी, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, अथर्ववेद, स्नेहल, अमित पार्क, कांचनगंगा, अलकनंदा, शिवप्रभा, मंत्री पार्क, श्रावणधारा, सहजानंद (भाग), शांतीबन, गांधी स्मारक परिसर, किलरेस्कर कंपनी- सकाळी ५ ते ९.
लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृण्मयी व परिसर- सकाळी ८.३० ते दुपारी १.
तेजसनगर, साई, उष:प्रभा, शशिकांत टेरेस, पाटील बाग व संपूर्ण भाग- सकाळी ६ ते १०.
७) डहाणूकर कॉलनी व परिसर.
एक्सप्रेस तेजसनगर सोसायटी, राहुलनगरचा काही भाग, डहाणूकर कॉलनीचा काही भाग- सकाळी ८.३० ते १.३०.
हॉटेल मिर्च मसाला परिसर, श्रीराम रेसिडेन्सी, स्नेहल बिल्डिंग, सिल्व्हर लाईन, अमन पार्क, तिरुपती सोसायटी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी काही भाग, डहाणूकर कॉलनी- सकाळी ११ ते ३.
८) कोथरूड गावठाण, पौड रस्ता व परिसर.
कोथरूड गावठाण, म्हातोबा मंदिर परिसर- सायंकाळी ५.३० ते ९.३०. आनंदनगर, मयूर कॉलनी, आयडियल कॉलनी, पौड रस्ता डावी बाजू, इशदान सोसायटी, सर्वत्र सोसायटी, प्रशांत, न्यू अजिंठा, प्रतीकनगर, मधुराजनगर, गुजरात कॉलनी, आझादवाडी- सकाळी ५.३० ते ९.३०.
 मूयर कॉलनी, करिष्मा सायंकाळी ५.३० ते ९.३०., बीग बझार परिसर, बंधन सोसायटी परिसर- सकाळी ८.३० ते १.३०.
९) नवसह्य़ाद्री, अलंकार व परिसर.
नवसह्य़ाद्री, करिष्मा सोसायटी, वारजे क्षेत्रीय कार्यालय परिसर, गिरीजाशंकर, ताथवडे उद्यान परिसर, नीलकमल, युनायटेड वेस्टर्न, अनुरेखा, स्थैर्य, मधुसंचय, शैलेश, अलंकार सोसायटी, मनीषा, स्वस्तीश्री, रघुकुल, महिम्न, सुवर्णरेखा, जयशक्ती, सविता आदी सोसायटय़ा, विठ्ठलमंदिर रस्त्यापर्यंत, डीपी रस्ता- सकाळी ८.३० ते १.३०.
१०) नळस्टॉप ते म्हात्रे पूल व परिसर.
दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत, म्हात्रे पुलापर्यंत, एचए कॉलनी, टिळेकर प्लॉट, भरतनगर, अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदिर, सुनीता, युको बँक कॉलनी, डीपी रस्ता, हिमाली सोसायटी, वकीलनगर- सायंकाळी ५.३० ते ९.३०.

चतु:शृंगी पाणीपुरवठा विभाग-
१) संगमवाडी- सकाळी ९.३० ते १२.३०.
२) मुळा रस्ता-  सकाळी ५.३० ते १०.३०.
३) मरीआई गेट परिसर- रात्री १२ ते सकाळी १०.
४) मॉडर्न महाविद्यालय, फग्र्युसन रस्ता, शिरोळे वस्ती, घोले रस्ता- सायंकाळी ५.३० ते ९.३०.
५) एरंडवणे गावठाण, कर्वे रस्ता, बीएमसीसी रस्ता व परिसर- सायंकाळी ५.३० ते ९.३०.
६) गोखलेनगर, जनवाडी, वडारवाडी- सकाळी ५ ते ९, सायंकाळी ५.३० ते ९.३०.
७) गोखलेनगर, जनवाडी, वैदुवाडी, चतु:शृंगी परिसर- सकाळी ५ ते ९.
८) मॉडेल कॉलनी, ओम सुपर मार्केट, खैरवाडी, चाफेकर वसाहत, भोसलेनगर, अशोकनगर, रेंजहिल्स, रेव्हेन्यू सोसायटी, कस्तुरकुंज- सायंकाळी ५.३० ते ९.३०, रात्री ११ ते पहाटे ५.
९) खडकी कॅन्टोन्मेंट- सकाळी ६ ते ८.
१०) बोपोडी, औंध रस्ता, चिखलवाडी, पडाळवस्ती- सकाळी ४.३० ते ९.३०.
११) पुणे विद्यापीठ, राजभवन- रात्री १२ ते सकाळी ४.
१२) सकाळनगर, कस्तुरबा वसाहत, सिद्धार्थनगर- सायंकाळी ४.३० ते ९.३०.
१३) सोमेश्वरवाडी, निम्हण मळा, लमाणतांडा- सकाळी ५ ते ९.३०.
१४) औंध गाव, वायरलेस विभाग, नागरस रस्ता, आयटीआय, सिंध कॉलनी- सायंकाळी ४.३० ते ९.३०.
१५) पाषाण बाणेर लिंक रस्ता- रात्री २.३० ते सकाळी ४.३०.
१६) बाणेर, बालेवाडी, विधाते वस्ती, सानेवाडी, आनंद पार्क- सायंकाळी ५ ते ९.३०.
१७) पाषाण गावठाण- सकाळी ५ ते ९.
१८) विठ्ठलनगर परिसर- सकाळी ९ ते ११.३०.
१९) सुतारवाडी गावठाण, पाषाण- सकाळी ४.३० ते ८.३०
२०) सूस रस्ता, पांडवनगर, शिक्षक कॉलनी- सकाळी ८.३० ते ११.३०.
२१) सूस रस्ता, वरदायिनी, शिवालय व परिसर- सकाळी ११.३० ते २.

लष्कर पाणीपुरवठा विभाग-
लष्कर पाणीपुरवठा विभागातर्फे ज्या भागांना पाणी दिले जाते, त्या सर्व भागांचा पाणीपुरवठा सध्याप्रमाणेच सुरू राहील.

वडगाव पाणीपुरवठा विभाग-
वडगाव जलशुद्धीकरण केंद्रामार्फत धनकवडी, कात्रज, सेमिनरी हिल, वडगाव धायरी आदी भागांना पाणीपुरवठा केला जातो. या भागांच्या पाणीपुरवठय़ात कपात केली जाणार असून वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.