ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी आपला साहित्यिक कार्यासाठीचा एक लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेला देण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना साहित्यिक कार्यासाठी एक लाख रुपयांचा निधी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात देण्यात येतो. नाशिक येथे झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. जयंत नारळीकर यांनी भूषविले होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते संमेलनास उपस्थित राहू शकले नव्हते. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांच्याशी या निधीसंदर्भात संपर्क साधला. त्यावेळी हा निधी न स्वीकारता महाराष्ट्र साहित्य परिषदेला देण्याचा निर्णय घेतल्याचे मंगला नारळीकर यांनी सांगितले.

sharad pawar
बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका
Sambhaji Bhide News
मनमाडमध्ये संभाजी भिडेंची कार अडवत घोषणाबाजी, काळे झेंडेही दाखवले, जाणून घ्या काय घडलं?
Sharad Pawar was given a clear speech by the Collector Office on the invitation of Namo Maha Rozgar Melava
… म्हणून शरद पवार यांना नमो महा रोजगार मेळाव्याचे निमंत्रण नाही; जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली ‘ही’ स्पष्टोक्ती
prakash ambedkar, manoj jarange patil, maratha reservation, vanchit bahujan aghadi, politics, maharashtra,
आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा समाजाने निवडणुका लढवाव्या; प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

प्रा. जोशी यांनी सांगितले की, “२०१० मध्ये पुण्यात डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ८३ व्या साहित्य संमेलनानंतर आयोजक संस्था असलेल्या पुण्यभूषण फाउंडेशनने ८२ लाख रुपयांची देणगी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिली. त्या देणगीच्या व्याजातून अन्य साहित्यिक उपक्रमांबरोबर प्रतिवर्षी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना एक लाख रुपयांचा निधी दिला जातो. महाराष्ट्रातील आणि बृहन्महाराष्ट्रातील अनेक साहित्यसंस्था आणि ग्रंथालये कार्यक्रमासाठी संमेलनाध्यक्षांना निमंत्रित करीत असतात. अध्यक्षांच्या प्रवास, निवासाची व्यवस्था करण्यात निधीअभावी अडचणी येऊ नये या उद्देशातून संमेलनाध्यक्षांना हा निधी दिला जातो.”