पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्याने मटार, टोमॅटो, फ्लाॅवर, कोबी, आले या फळभाज्यांच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटकातून घेवडा आणि पावटा प्रत्येकी ३ ते ४ टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ४ ते ५ टेम्पो शेवगा, राजस्थानातून १० ते १२ टेम्पो गाजर, मध्य प्रदेशातून २४ ते २५ ट्रक मटार, तमिळनाडूतून २ टेम्पो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेशातून ७ ते ८ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ५५० ते ६०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो १० ते १२ हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा १२५ ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ३५ ते ४० टेम्पो बटाट्याची आवक झाली.

Rose farming in water-scarce areas like Kalas in Indapur taluka
कळसच्या माळरानावर फुलतोय, फुलांचा राजा ‘गुलाब’
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
fruits export clusters
राज्यात फळ निर्यातीसाठी तीन क्लस्टर, जाणून घ्या, कोणत्या फळासाठी, कुठे होणार क्लस्टर
soybean news in marathi
नोंदणी केलेल्या पाच हजार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अजूनही रखडली, शासनाकडे मुदत वाढवण्याची मागणी
pune vegetable prices marathi news
पुणे : आले, लसूण, काकडी, ढोबळी मिरची, मटारच्या दरात घट
Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
nikki tamboli and samir choughule
Video: निक्की तांबोळी आणि समीर चौघुले यांनी सांगितली चमचमीत बटाटावड्याची रेसिपी; पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>> खराडीतील सोसायटीत दूषित पाण्याचापुरवठा करणारा टँकर व्यावसायिक अटकेत, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाण्याचा पुरवठा केल्याचे उघड

पालेभाज्यांच्या दरात घट

आवक वाढल्याने बहुतांश पालेभाज्यांच्या दरात घट झाली. कोथिंबिर, मेथी, शेपू, कांदापात, करडई, पुदिना, राजगिरा, चुका, पालक, हरभरा गड्डीच्या दरात घट झाली. अंबाडीच्या दरात अल्पशी वाढ झाली. चाकवत, मुळे, चवळईचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. तरकारी विभागात कोथिंबीर दीड लाख जुडी, तसेच मेथीच्या ८० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- ४०० ते ८००, मेथी -४०० ते ७००, शेपू – ५०० ते ७००, कांदापात- ५०० ते ८००, चाकवत – ४०० ते ७००, करडई- ३०० ते ६००, पुदिना – ३०० ते ७००, अंबाडी – ४०० ते ७००, मुळे – ८०० ते १०००, राजगिरा- ४०० ते ६००, चुका – ४०० ते ७००, चवळई- ३००-६००, पालक- ६००-१०००. हरभरा गड्डी – ८०० ते १०००

हेही वाचा >>> दुचाकीस्वार महिलेकडून महिला पोलिसाला धक्काबुक्की; वारजे भागातील घटना

संत्री, बोरे, पेरू, पपई, कलिंगड महाग

मार्केट यार्डातील फळबाजारात संत्री, बोरे, कलिंगड, खरबूज आणि पपईच्या दरात वाढ झाली आहे. सीताफळ, चिकू, अननस, लिंबू, मोसंबी, डाळिंबाचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी जुन्या आणि नव्या बहरातील मोसंबी ३० ते ४० टन, संत्री ४० ते ५० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई ७ ते ८ टेम्पो, लिंबे १३०० गोणी, कलिंगड ९ ते १० टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिकू एक हजार गोणी, पेरू ३०० ते ५०० प्लास्टिक जाळी (क्रेट), अननस ६ ट्रक, बाेरे दीड हजार गोणी, सीताफळ २ ते ३ टन अशी आवक झाली.

Story img Loader