scorecardresearch

पुणे: युवतीच्या नाका- तोंडात गांजाचा धूर सोडून अत्याचार

या प्रकरणी एकाच्या विरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

women tortured
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: युवतीला गांजाची नशा करण्यासाठी धमकावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. युवतीच्या नाका- तोंडात गांजाचा धूर सोडल्याने युवतीला गुंगी आली. त्यानंतर आरोपीने तिला मारहाण करुन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी एकाच्या विरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा- ओशो आश्रम परिसरात गोंधळ घालणाऱ्या १२० अनुयायांच्या विरोधात गुन्हा

या प्रकरणी श्रवण राजेंद्र अंकुशे (रा. उंड्री) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका युवतीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्रवण आणि पीडित युवतीचे प्रेमसंबंध होते. श्रवणचे दुसऱ्या एका युवतीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय पीडित युवतीला होता. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. युवतीने श्रवणशी असलेले प्रेमसंबंध तोडले होते. त्यानंतर श्रवण युवतीच्या घरात कोणी नसताना शिरला. युवतीला गांजाची नशा करण्यास सांगितले. तेव्हा तिने नकार दिला. त्याने युवतीला मारहाण केली आणि तिचे हात पाय बांधले. त्याने गांजाचा धूर तिच्या नाका तोंडात सोडला. युवतीला गुंगी आली. त्याने युवतीला मारहाण करुन तिच्यावर अत्याचार केला. श्रवण याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक तोरगल तपास करत आहेत. 

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 11:03 IST

संबंधित बातम्या