गणेशखिंड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील (आचार्य आनंदऋषीजी चौक) मेट्रो मार्गिका तसेच दुहेरी उड्डाणपुलाच्या कामासाठी करण्यात आलेले वाहतूक बदल स्थगित करण्यात आले आहे. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. वाहतूक बदलामुळे वाहनचालकांना वळसा घालून ओैधकडे जावे लागत होते. या भागातील अंतर्गत रस्त्यावर कोंडी होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या भागातील वाहतूक पूर्ववत करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी बुधवारी सायंकाळी दिले.

हेही वाचा >>>पुणे: माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी आज आधुनिक युग..; देवेंद्र फडणवीस

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
girl kidnap viman nagar
खंडणीसाठी विमाननगरमधून महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण

वाहतूक पूर्ववत केल्याने वाहनचालकांना नेहमीप्रमाणे विद्यापीठ चौकातून ओैंधकडे जाता येणार आहे. विद्यापीठ चौकात मेट्रो मार्गिकेचे काम सुरू करण्यात आल्याने शनिवारपासून (११ फेैब्रुवारी) बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता आणि सेनापती बापट रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर वाहतूक बदल करण्यात आले. त्यामुळे बाणेर आणि ओैंध रस्त्याने येणारी विद्यापीठ चौकात येणारी वाहने विना सिग्नल डाव्या मार्गिकेने शिवाजीनगरकडे जात होती. ओैंधकडे जाणारे वाहनचालक अभिमानश्री सोसायटीतून वळून बाणेर फाटा चौकातून पुन्हा विद्यापीठ चौकात येत होते. विद्यापीठ चौकातून वळून पुन्हा वाहनचालकांना ओैंधकडे जाण्याची मुभा देण्यात आली होती. या भागातील वर्तुळाकार वाहतूक योजनेमुळे अभिमानश्री सोसायटी परिसरात वाहतूक कोंडी होत होती. वाहनचालकांना वळसा घालून जावे लागत हाेते. वाहतूक बदलांमुळे वाहनचालकांनी तक्रारी केल्या होत्या.त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी बुधवारी (१५ फेब्रुवारी) सायंकाळी या भागातील वाहतूक बदल स्थगित केले. या भागातील वाहतूक पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले.