नगर रस्त्यावरील पेरणे फाटा येथे एक जानेवारी २०२३ रोजी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील अनुनायी उपस्थित राहणार असल्याने एक जानेवारी रोजी वाहतूक बदल करण्यात येणार आहे.

हेही वाचा- दहा वर्षानंतर राज ठाकरे यांचे उद्या पुण्यात व्याख्यान; राज ठाकरे ‘नवं काही तरी’ बोलणार का?

Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शनिवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी पाच वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. एक जानेवारी रोजी रात्री बारा वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू राहणार आहे. अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या वाहनांना पेरणे फाटा परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे. अन्य वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

वाहतूक बदल पुढीलप्रमाणे- पुण्याहून नगरकडे जाणारी जड वाहने खराडी बाह्यवळण मार्ग चौकातून हडपसर मार्गे वळविण्यात येणार. खराडी भागताील वाहने पुणे- सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे, न्हावरा, शिरूर, नगर रस्ता अशी जाणार आहेत. शिक्रापूर ते चाकण या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. नगरहून पुणे- मुंबईकडे येणारी जड वाहने शिरुर, न्हावरे फाटा, न्हावरे, पारगाव, चौफुला, यवत, सोलापूर रस्तामार्गे पुण्याकडे येतील. मुंबईहूनन नगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक करणारी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नगरकडे जातील. मोटार, जीप अशी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे नगरकडे जातील.

हेही वाचा- सीबीएसई दहावी, बारावीची २ जानेवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षा

मोटार लावण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे-आपले घर शेजारी हनुमंत कंद यांची मोकळी जागा, सातव यांची माेकळी जागा, आपले घर शेजारील मोकळी जागा, लोणीकंद बौद्ध वस्ती शेजारी सागर गायकवाड यांची मोकळी जागा, तुळापूर फाटा स्टफ कंपनी शेजारील मोकळी जागा, सोमवंशी ॲकडमी समोर, खंडोबाचा माळ, तुळापूर रस्ता वाय पॉईन्ट, फुलगाव सैनिकी शाळा मैदान

दुचाकी लावण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे- तुळापूर फाटा, संगमेश्वर हॉटेल मागे, टाटा मोटर्स शोरूम मोकळे मैदान, शेजारील मैदान, पेरणे पोलिस चौकीमागील मोकळे मैदान, ज्योतिबा पार्क गोशाळेजवळील मोकळी जागा