पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन बुधवारी (२२ जून) शहरात होणार असून पालखी आगमन, मुक्काम, प्रस्थानानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. पालखी आगमनानिमित्त शहरातील प्रमुख रस्ते दुपारनंतर वाहतुकीस बंद राहणार आहेत.

शहरातील प्रमुख रस्ते तसेच मध्यभागातील रस्त्यांवर बुधवारी दुपारनंतर वाहतूक बदल करण्यात येणार आहे. वाहनचालकांना पालखी मार्गाची माहिती व्हावी, यासाठी diversion.punepolice.gov.in हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. पालखी सोहळ्याची माहिती टि्वटरद्वारे देण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यासाठी चार हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. साध्या वेशातील पोलीस पालखी सोहळ्यात गस्त घालणार असून पालखी सोहळ्यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
Changes in transport on the occasion of Shri Sant Tukaram Maharaj beej sohala
पिंपरी : श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल; ‘असा’ आहे बदल
Navi Mumbai Traffic congestion
नवी मुंबई : सलग सुट्ट्या आणि मेळाव्याने एपीएमसी परिसरात वाहतूक कोंडी

श्री संत तुकाराम महाराज पालखी आगमनानिमित्त बुधवारी वाहतुकीस बंद ठेवण्यात येणारे रस्ते पुढीलप्रमाणे- बोपोडी चौक ते खडकी बाजार, पोल्ट्री चौक, जुना मुंबई-पुणे रस्ता, आरटीओ चौक ते अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, येरवडा सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट चौक (संगमवाडी पूल).

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमनानिमित्त बंद ठेवण्यात येणारे रस्ते पुढीलप्रमाणे- आळंदी रस्ता, कळसफाटा ते बोपखेल फाटा, येरवडा मनोरुग्णालय, सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट.

वाहतूकीस बंद राहणारे प्रमुख रस्ते

रेंजहिल चौक ते संचेती चौक ते गणेशखिंड रस्ता बुधवारी दुपारनंतर वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. डेक्कन जिमखाना खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (फर्ग्युसन रस्ता) बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवार वाडा गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे) रस्ता बंद राहणार आहे. मॉडर्न महाविद्यालय रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

मध्यभागातील बंद राहणारे रस्ते

लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, लाल बहाद्दुर शास्त्री रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. पालखी आगमनानिमित्त नाना, भवानी, रास्ता पेठ परिसरातील अंतर्गत रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर मागील बाजुचे रस्ते वाहतुकीस खुले करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करुन वाहतूक पोलिसांच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.