पुणे : डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानक परिसरात उन्नत पादचारी मार्गाचे काम सुरू करण्यात येणार असून उद्यापासून (१३ सप्टेंबर) भागात प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक बदल करण्यात येणार आहे. डेक्कन जिमखाना पीएमपी स्थानकाकडून भिडे पुलाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. १४ नोव्हेंबरपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

हेही वाचा <<< ‘रस्त्यावर राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करा’; जनसंवाद सभेत नागरिकांकडून मागणी

megablock
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे – लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द, काही उशिराने धावणार
water cut Pune
पुण्यात अघोषित पाणीकपातीला सुरुवात : येत्या बुधवारी ‘या’ भागातील पाणी बंद
Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका
Pimpri mnc cut trees
धक्कादायक : पिंपरी महापालिका करणार १४२ झाडांची कत्तल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

हेही वाचा <<< पुणे : गुरुवारी संपूर्ण दिवस काही भागाचा पाणीपुरवठा बंद

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे. पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे- डेक्कन जिमखाना पीएमपी स्थानक, गरवारे पूल, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, केळकर रस्त्याने वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे. जंगली महाराज रस्त्यावरुन भिडे पुलाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रीज) इच्छितस्थळी जावे. भिडे पुलाकडून जंगली महाराज रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी भिडे पुलाकडून उजवीकडे वळून हॅाटेल सुकांतासमोरुन जंगली महाराज रस्त्याकडे जावे.