पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील सूर्यमुखी दत्त मंदिर चौक परिसरात मेट्रो मार्गिकेचे काम करण्यात येणार असल्याने गुरुवारपासून (११ ऑगस्ट) या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे. गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठचौकातून सूर्यमुखी दत्तमंदिर चौकातून थोरात चौकाकडे (मॅाडेल कॅालनीकडे) जाणाऱ्या वाहनांना सूर्यमुखी दत्तमंदिर चौकातून उजवीकडे वळण्यास तसेच यू टर्न घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थोरात चौकाकडून (मॅाडेल कॅालनी) येथून सूर्यमुखी दत्तमंदिर चौकातून उजवीकडे वळून वीर चापेकर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीरामे यांनी सांगितले. पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे- रेंजहिल्स चौक, विद्यापीठ चौकाकडून ये- जा करणारी वाहने वीर चापेकर चौकातून अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपुलाखालून यूटर्न घेऊन सूर्यमुखी दत्तमंदिर चौकातून डावीकडे वळून थोरात चौक किंवा सरळ विद्यापीठ चौकाकडे जातील. थोरात चौकाकडून सूर्यमुखी दत्तमंदिर चौकातून उजवीकडे वळणारी वाहने थोरात चौक, ललित महल चौकातून डावीकडे वळून वीर चापेकर चौकातून इच्छितस्थळी जातील.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic changes on ganeshkhind road for metro pune print news work zws
First published on: 10-08-2022 at 22:35 IST