scorecardresearch

पुणे: नववर्षाच्या पहिल्या दिवशी मध्यभागातील वाहतुकीत बदल; श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात होणार भाविकांची गर्दी

नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. रविवारी (१ जानेवारी) शिवाजी रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

पुणे: नववर्षाच्या पहिल्या दिवशी मध्यभागातील वाहतुकीत बदल; श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात होणार भाविकांची गर्दी
नववर्षाच्या पहिल्या दिवशी मध्यभागातील वाहतुकीत बदल(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. रविवारी (१ जानेवारी) शिवाजी रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. रविवारी पहाटे पाच वाजल्यानंतर या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. गर्दी ओसरेपर्यंत वाहतूक बदल राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मुभा देण्यात आली आहे.

हेही वाचा >>>पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी बांधली जाणार स्वतंत्र इमारत; १०९ कोटींच्या निविदेला तांत्रिक मान्यता

बाजीराव रस्त्यावरील पूरम चौक ते शनिवार वाडा दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी टिळक रस्त्याने डेक्कन जिमखान्याकडे जावे. अप्पा बळवंत चौक ते पासोड्या विठोबा चौक मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे चौक) ते महापालिका भवन ते शनिवारवाडा दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी जंगली महाराज रस्त्याने इच्छितस्थळी जावे.शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा ते रामेश्वर चाैक दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवाडा, सूर्या हाॅस्पिटलमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 14:01 IST

संबंधित बातम्या