पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त शहरात ठेवण्यात आलेला बंदोबस्त, तसेच नियोजनामुळे वाहतूक सुरळीत राहिली. सभेसाठी मोठी गर्दी होऊनही कोठेही गोंधळ उडाला नाही. सभा पार पडल्यानंतरही कोठे कोंडी झाली नाही.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची मंगळवारी सायंकाळी स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात सभा पार पडली. मोदी यांचे आगमनानिमित्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली होती. मोदी यांचे आगमन, तसेच प्रस्थानाचा मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा केंद्रीय सुरक्षा पथकांकडून घेण्यात आला होता. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, तसेच लोहगाव विमानतळ ते येरवडा गोल्फ क्लब रस्ता भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल केले होते. मोदी यांचा ताफा ज्या मार्गाने जाणार होता. त्या मार्गावर दुतर्फा वाहने लावण्यास मनाई करण्यात आली होती.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा >>>शरद पवार यांची उद्या भोसरीत सभा, तर गुरुवारी पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच रोड शो

सभेसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी कार्यकर्त्यांची ने आण करणाऱ्या वाहनांसाठी जागा निश्चित (पिकअप अँड ड्राॅप) केल्या होत्या. तेथून कार्यकर्ते स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात पोहोचले. सभा पार पाडल्यानंतर माेदी यांचा ताफा नियोजित मार्गाने लोहगाव विमानतळाकडे रवाना झाला. पोलिसांनी नियोजन केल्याने मध्यभागातील वाहतूक सुरळीत राहिली. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी नियोजन केले, तसेच चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, दहा पोलीस उपायुक्त, २३ सहायक पोलीस आयुक्त, १३५ पोलीस निरीक्षक, ५७० पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.

हेही वाचा >>>पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त

मोदी यांचा ताफा पाहण्यासाठी गर्दी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पाहण्यासाठी जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, फर्ग्युसन रस्ता परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. सभा संपल्यानंतर मोदी यांचा ताफा फर्ग्युसन रस्त्याने विमानतळाकडे मार्गस्थ झाला. या रस्त्यांवरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती.

सोलापूर रस्त्यावर कोंडी

मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर नगर रस्त्यावरील वाहतूक सोलापूर रस्त्याने वळविण्यात आली. त्यामुळे सोलापूर रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. शहरात येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.

Story img Loader