पुणे : नो पार्किंगमध्ये लावलेल्या मोटारीच्य चाकाला लावलेला जॅमर काढण्यासाठी एक हजारांची लाच मागणार्‍या वाहतूक शाखेतील वॉर्डनसह  हायक फौजदाराविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही समर्थ वाहतूक विभागात कार्यरत आहेत.

हेही वाचा >>> एक काळ असा होता…

thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
the Indian soldier returned home safely After serving the country for 21 years
२१ वर्ष देशसेवा करून सुखरूप घरी परतला भारतीय जवान, पत्नीचे अश्रु थांबत नव्हते; VIDEO पाहून व्हाल भावुक

सहायक पोलीस फौजदार किरण दत्तात्रय रोटे (वय ५१), ट्रॅफिक वॉर्डन अनिस कासम आगा (वय ४८, रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका मोटरचालकाने  फिर्याद दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. समर्थ वाहतूक विभागांतर्गत येणार्‍या एका रस्त्यावरील नो पार्किंगमध्ये तक्रारदाराने त्यांची मोटार लावली होती. त्यामुळे वाहतूक विभागाने त्यांच्या मोटारीला जॅमर लावला. जॅमर काढण्यासाठी समर्थ वाहतूक विभागातील ट्रफिक वॉर्डन (वाहतूक मदतनीस) अनिस आगा याने तक्रारदाराकडे १ हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त

एसीबीने याची पडताळणी केली. त्यामध्ये वॉर्डन अनिस याने एक हजारांची लाच मागून तडजोडीत सातशे रूपये स्विकारण्याचे मान्य केले.  अनिस हा कार्यालयात उपस्थित नसताना तक्रारदार समर्थ वाहतूक विभागाच्या कार्यालयात गेले. त्यावेळी सहायक फौजदार रोटे यांनी अनिसने मागितलेले पैसे माझ्याकडे दे, असे म्हणून लाच घेण्यास संमती दर्शविली. त्यानूसार एसीबीने  वॉर्डन अनिस आणि सहायक फौजदार रोटे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. एसीबीचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Story img Loader