कोरेगाव पार्क भागातील अन्न धान्य महामंडळाच्या गोदामात मतमोजणी गुरुवारी (२ मार्च) होणार असून या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. बुधवारी (१ मार्च) सकाळी अकरा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहतूक बदल लागू राहणार आहेत. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> पुणे : प्रमोद चौघुले सलग दुसऱ्यांदा राज्यसेवा परीक्षेत प्रथम
कोरेगाव पार्क भागातील सेंट मीरा कॉलेज आणि अतुर पार्क सोसायटीकडून साऊथ मेन रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांना गल्ली क्रमांक एकपर्यंत प्रवेश देण्यात येईल. गल्ली क्रमांक एक येथून वाहनचालकांनी डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे. या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून लोखंडी कठडे उभे करण्यात येणार आहेत. साऊथ मेन रस्त्यावरील गल्ली क्रमांक पाच, सहा आणि सातकडून साऊथ मेन रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांना गल्ली क्रमांक चारपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे. गल्ली क्रमांक चार येथून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
आवश्यकतेनुसार सेंट मीरा काॅलेजसमोर, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यासमोर आणि साऊथ मेन रस्त्यावर गल्ली क्रमांक पाच येथे लोखंडी कठडे उभे करण्यात येईल. साऊथ मेन रस्त्यावरील गल्ली क्रमांक दोन येथे प्लॉट क्रमांक ३८, जैन प्राॅपर्टीसमोर लोखंडी कठडेउभे करण्यात येणार असून तेथून सर्व वाहनांना साऊथ मेन रस्त्याकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येणार आहे. साऊथ मेन रस्त्यावरील गल्ली क्रमांक ३ येथे बंगला क्रमांक ६७ आणि ६८ दरम्यान लोखंडी कठडे उभे करण्यात येणार असून सर्व प्रकारच्या वाहनांना साऊथ मेन रस्त्याकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येणार आहे. दरोडे पथ (कोरेगाव पार्क पोलीस ठाणे) ते गल्ली क्रमांक पाच साऊथ मेन रस्त्यावर दुतर्फा बुधवारी सकाळी ११ वाजल्यानंतर मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> येरवडा पोलिसांनी जप्त केलेल्या मोटार, दुचाकींचे टायर चोरीला
हने लावण्यासाठी सुविधा मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दुचाकी वाहने संत गाडगेमहाराज शाळेच्या आवारात करावीत. मतमोजणीसाठी येणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी तसेच अन्य नागरिकांनी त्यांची वाहने संत गाडगेमहाराज शाळेच्या आवारात करावीत, असे आवाहन पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.