scorecardresearch

पुणे: वाघापूर ते शिंदवणे या मार्गावरील वाहतूक उद्यापासून बंद ; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

तळेगाव ढमढेरे ते जेजुरी राष्ट्रीय मार्ग क्रमांक ११७ या रस्त्याचे मजबुतीकरण, तसेच शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे काम सुरु आहे.

traffic police
घोडबंदर मार्गावर मेट्रो कामांसाठी मध्यरात्री वाहतूक बदल(संग्रहित छायाचित्र)

तळेगाव ढमढेरे ते जेजुरी राष्ट्रीय मार्ग क्रमांक ११७ या रस्त्याचे मजबुतीकरण, तसेच शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे शुक्रवारपासून (२४ मार्च) २९ एप्रिल या कालावधीत वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक सासवड- पिसर्वे-टेकवडी-बोरीऐंदी आणि सासवड-वाघापूर चौफुला-माळशिरस-यवत या मार्गे वळविण्यात आली आहे.

हेही वाचा >>>भाजपच्या सरचिटणीसाला मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्यावर गुन्हा

याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रसृत केले आहेत. नागरिकांनी वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक कोंडी तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 19:22 IST

संबंधित बातम्या