कोथरुड येथील डहाणूकर कॉलनी मधील इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरमधे मांजर अडकल्याने आज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटची घटना घडली. वाळू आणि माती टाकून अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. अग्निशामक दलाच्या आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, डाहणूकर कॉलनी मधील गल्ली नंबर ९ मध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये मांजर अडकल्याने वायर जळण्यास सुरुवात झाली. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच. त्वरित अग्निशामक दलाच्या आधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर कोथरुड अग्निशामक दलाचे कर्माचारी घटना स्थळी पोहचून वाळू आणि माती टाकून आग आटोक्यात आणली. मांजरीला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
