पुण्यात तृतीयपंथीयाची हत्या

महंमदवाडी येथील सदाशिवनगर परिसरातील पिंपळे इमारतीमध्ये अरबाज शेख राहत होता. त्याने अनेक कार्यक्रमांमध्ये नृत्य देखील केले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यातील महंमदवाडी येथे एका इमारतीमध्ये राहणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीची अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अरबाज शेख (वय 20) असे हत्या झालेल्या तृतीय पंथी व्यक्तिचे नाव आहे.

महंमदवाडी येथील सदाशिवनगर परिसरातील पिंपळे इमारतीमध्ये अरबाज शेख राहत होता. त्याने अनेक कार्यक्रमांमध्ये नृत्य देखील केले आहे. सोमवारी सकाळी राहत्या घरी अरबाजचा मृतदेह आढळला. गळा चिरुन त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Transgender murdered at residence in sadashiv nagar

ताज्या बातम्या