scorecardresearch

भारतरत्न प्राप्त पुणेकरांच्या कुटुंबीयांचा सत्कार

‘भारतरत्न’प्राप्त पुणेकरांच्या कुटुंबीयांचा सत्कार करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

Tribute families Bharat Ratna recipients pun
भारतरत्न प्राप्त पुणेकरांच्या कुटुंबीयांचा सत्कार (image – लोकसत्ता टीम)

पुणे : स्त्री शिक्षण क्षेत्रातील योगदान देणारे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी या ‘भारतरत्न’प्राप्त पुणेकरांच्या कुटुंबीयांचा सत्कार करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

मधुरे इन्फ्रा इंजिनिअरिंग प्रा. लि. च्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कुटुंबातील मीना आनंद कर्वे, डॉ. प्रियदर्शिनी कर्वे आणि पं. भीमसेन जोशी यांच्या कुटुंबातील लक्ष्मी जयंत जोशी आणि शुभदा मुळगुंद हे सदस्य सहभागी झाले होते.  त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

हेही वाचा – पुणे : परिचारिकेचा विनयभंग करणाऱ्या डाॅक्टरविरुद्ध गुन्हा

पुण्याजवळील सणसवाडी (ता. शिरूर) येथील पिंपळे जगताप येथे ‘जियांग्यीन युनी-पॉल व्हॅक्युम कास्टिंग इंडिया प्रा. लि.’ कंपनीच्या ३९० मीटर लांब भिंतीवर सर्व ४८ भारतरत्नांचे चेहरे स्वखर्चाने रेखाटून मधुरे इन्फ्रा इंजिनीअरिंग प्रा. लि. ने भारतरत्न प्राप्त महनीय व्यक्तींना प्रजासत्ताकदिनी अनोखी मानवंदना दिली.

हेही वाचा – पुणे : रस्ता चुकल्याने झालेल्या वादातून ट्रकचालकाचा सहकाऱ्याकडून खून

‘जियांग्यीन युनी-पॉल व्हॅक्युम कास्टिंग’कंपनी चे संचालक अंकीत हांडा, प्रकल्पाचे वास्तुविशारद मयूर वैद्य, पी. एन. सप्रे, ओंकार कुलकर्णी, अजितकुमार पाटील, मुख्याध्यापिका मंगल वाजे, स्वाती बेंडभर या वेळी उपस्थित होत्या. उमेश मधुरे आणि सुनीता मधुरे यांनी स्वागत केले. दीपक बीडकर यांनी सूत्रसंचालन केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 15:56 IST