scorecardresearch

पुणे: नवले ब्रिजवर ट्रक चढत असतानाच ब्रेक फेल; रस्त्याशेजारी उभ्या तिघांना फरफटत नेलं अन्…; पहा काय घडलं

ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना ट्रकने चिरडले

पुणे: नवले ब्रिजवर ट्रक चढत असतानाच ब्रेक फेल; रस्त्याशेजारी उभ्या तिघांना फरफटत नेलं अन्…; पहा काय घडलं
ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना ट्रकने चिरडले

पुण्यातील नवले ब्रिज येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्या घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळ वरून फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले ब्रिज येथील मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या भूमकर पुलाच्या उतारावर आयशर ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या तिघांना त्याने काही अंतर फरफटत नेले. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला आहे. ट्रकने काही चारचाकी वाहनांनादेखील धडक दिली. ट्रकने दिलेल्या धडकेमुळा या वहानांचंही नुकसान झालं.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2021 at 12:02 IST

संबंधित बातम्या