लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: ट्रकवर आदळून मालवाहू पिकअप चालकाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर लोणीकाळभोर परिसरात घडली.

accident on Jat- Kavthemahankal road 5 dead and 5 serious injured
जत- कवठेमहांकाळ मार्गावर अपघात; ५ ठार, ५ गंभीर
bus-two wheeler accident, Grand daughter died,
बस-दुचाकी अपघातात आजोबांसह नातीचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन
one dead in Accident on JNPT Palaspe National Highway
जेएनपीटी पळस्पे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यू
navi mumbai, palm beach road
नवी मुंबई: पामबीच मार्गावर वाहतूक संथगतीने

महादेव वामन जोगदंड (वय २७, सध्या रा. सहजपूर, ता. दौंड, जि. पुणे, मूळ रा. वडगाव, ता. निलंगा, जि. लातूर) असे मृत्युमुखी पडलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. पिकअपचालक जोगदंड पुणे-सोलापूर महामार्गावरुन निघाला होता. लोणी काळभोर परिसरातील कदमवाक वस्ती परिसरात भरधाव पिकअप वाहनाने पाठीमागून ट्रकला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जोगदंड याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक हंबीर तपास करत आहेत.