scorecardresearch

मार्केट यार्डात ट्रक चालकाला लुटले ;चोरटे गजाआड

मार्केट यार्ड परिसरातून जात असलेल्या ट्रक चालकाला धमकावून त्याच्याकडील दहा हजारांची रोकड तसेच मोबाइल संच असा मुद्देमाल लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले.

man-arrested-1
(प्रातिनिधिक छायाचित्र)

मार्केट यार्ड परिसरातून जात असलेल्या ट्रक चालकाला धमकावून त्याच्याकडील दहा हजारांची रोकड तसेच मोबाइल संच असा मुद्देमाल लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले.बबलू उर्फ कपील अतुल शिंदे (वय १९), अविनाश राम निंबाळकर (वय २३, दोघे रा. प्रेमनगर वसाहत, मार्केट यार्ड) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांच्या बरोबर असलेल्या एका साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ट्रक चालक आशिष राठोड (वय २६, रा. कारोळ, ता. पुसद, जि. यवतमाळ) याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राठोड मार्केट यार्डातील वखार महामंडळ चौकातून जात होता. त्याच्या ट्रकमध्ये भंगार माल होता. वखार महामंडळ चौकात आरोपी शिंदे, निंबाळकर आणि साथीदाराने ट्रक अडवला. राठोडला धमकावून त्याच्याकडील रोकड आणि मोबाइल संच असा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. घाबरलेल्या राठोडने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्वरीत तपास सुरू केला. मार्केट यार्ड परिसरात चोरटा शिंदे आणि साथीदार निंबाळकर यांना पकडले. त्याच्या बरोबर असलेल्या साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांनी दिली. सहायक निरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Truck driver was robbed market yard thieves pune print news amy

ताज्या बातम्या