वडगावजवळ मिठाईच्या दुकानात घुसला ट्रक; संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू

चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

पुणे : वडगाव येथे झालेल्या भीषण अपघातात मिठाईच्या दुकानात घुसलेला ट्रक; यात एका संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू जागीच मृत्यू झाला.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कात्रज हायवेवरून आलेला एक काँक्रिट मिक्सरचा ट्रक थेट वडगावजवळील नवले ब्रिजखालील एका मिठाईच्या दुकानात घुसला. या भीषण अपघातामध्ये एक संगणक अभियंता महिला ट्रकमध्ये अडकून जागीच ठार झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज हायवेवरून नवले ब्रीजच्या बाजूने जात असताना एक काँक्रिट मिक्सरचा ट्रक काही समजण्याआधीच रस्त्याच्या बाजूला असलेल्या सिरवी मिठाईवाले या दुकानात घुसला. या भीषण अपघातात एक तरुणी त्या ट्रकमध्ये अडकून पडली. तब्बल तासाभराच्या प्रयत्नानंतर त्या तरुणीची सुटका करण्यात आली. मात्र, तोपर्यंत तीचा मृत्यू झाला होता. स्वाती मधुकर ओरके (वय २९, रा. कर्वेनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. इतर दोन महिलांदेखील या घटनेत जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Truck enters sweet shop at wadgaon computer engineers death

ताज्या बातम्या