पिंपरी चिंचवड मधील किवळे येथील मुकाई चौकात मध्यरात्री शॉर्ट सर्किट होऊन ट्रकने पेट घेतला. यामध्ये ३० ते ४० लाख रुपयांंचे नुकसान झाल्याचे देहूरोड पोलिसांनी सांगितले आहे. ट्रक जळून खाक झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ट्रक ने पेट घेतला. त्याच्यातील तेलाचे डब्बे, इलेट्रिक साहित्य आणि वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य असा ३० ते ४० लाख रुपयांचा माल जाळून खाक झाला आहे. नागेश्वर ट्रान्स्पोर्ट या कंपनीचा हा ट्रक आहे.

जांबे येथे त्यांचे ऑफिस असून हा ट्रक तेथे पोहचता करायचा होता मात्र रात्री उशीर झाल्याने ट्रक चालकाने किवळे येथील मुकाई चौक मध्ये असणाऱ्या त्याच्या घराशेजारी ट्रक लावला होता. अचानक मध्यरात्री २ वाजता बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ट्रक ने पेट घेतला. समोरच्या इमारतीमधील वाचमनने पाहिले असता त्याने अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण केले गेले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र त्यामधील तब्बल ३० ते ४० लाख रुपयांचा माल जाळून खाक झाला. निवृत्ती रानडे असे ट्रक मालक आणि नागेश ट्रान्स्पोर्ट मालकाचे नाव आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.